पुढारी ऑनलाईन डेस्क - सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा २ : द रूल' रिलीज होण्याआधीच टॉपवर आहे. चित्रपटाची प्री-बुकिंग झाली असून ३० नोव्हेंबरपासूनचे ॲडव्हान्स बुकिंग झाले. दोन दिवसात १ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत ५ भाषांमध्ये चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे. पहिल्या दिवशी जवळपास २२ कोटी रुपयांचे प्री-सेल्स बुकिंग झाले आहे.
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा २' यवर्षीचा २०२४ चा सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. २०२१ मध्ये 'पुष्पा : द राईज' नंतर प्रेक्षक, खासकरून अल्लू अर्जुनचे फॅन्स त्याच्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. गुरुवार, ५ डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होत आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये 2D, 3D, IMAX व्हर्जनमध्ये रिलीज होईल.
रिपोर्टनुसार, ४८ तासांच्या आत 'पुष्पा २ : द रूल' च्या प्री-सेल्सने ओपनिंग डेसाठी २१.९९ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. तर ब्लॉक सीट्ससोबत ३१.३२ कोटी रुपयांचे ॲडव्हान्स बुकिंग झाली आहे. चित्रपटाचे १६ हजारहून अधिक शोजसाठी रविवार रात्रीपर्यंत ६.७४ लाखाहून अधिक तिकीट विक्री झाली आहे.