why Priyanka Pandit leaved glamour world
मुंबई - एका MMS नंतर भोजपुरी अभिनेत्रीचे करिअर बाद झाले. यानंतर तिने ग्लॅमर वर्ल्ड सोडून थेट वृंदावन गाठले. कृष्ण भक्तीत तल्लीन होऊन ती आपले आयुष्य जगतेय, जाणून घ्या, नेमकं काय झालं? प्रियंका पंडित असे तिचे नाव आहे. तिने भोजपुरी इंडस्ट्री खेसारी लाल यादव, पवन सिंह, रितेश पांडे यासारख्या हिट कलाकारांसोबत अभिनय केला आहे. पण असं काय घडलं की, तिने चित्रपट इंडस्ट्री सोडली.
आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी ग्लॅमर वर्ल्ड सोडलं आहे. यामध्ये प्रियंका पंडित हिच्या नावाचाही समावेश आहे.तिने अनेक वर्षे कलाविश्वात काम केल्यानंतर इंडस्ट्रीला अलविदा म्हटलं आहे. इंडस्ट्री सोडल्यानंतर ती कृष्णाच्या भक्तीत लीन झाली. ती प्रेमानंद जी महाराज यांची अनुयायी बनलीय. ती कृष्णाची भक्त बनली. तिने वृंदावनमध्ये आपलं घर वसवलं आहे. इतकेच नाही तर तिने गुपचुप लग्न करून नव्या आयुष्याचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आहे.
एकेकाळी ती भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा होती. तिचा जन्म जौनपूरमध्ये झाला होता. तिने ५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. ती अभिनयात तरिअर करत असताना तिचा बॉयफ्रेंडसोबत फेक MMS लीक झाला. त्यानंतर तिचे बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप झालं. यानंतर तिला काम मिळणं बंद झालं आणि तिचं करिअर खराब झालं.
प्रियंका सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे आणि इंस्टाग्रामवर भक्तिमय व्हिडिओ-फोटोज शेअर करते. तिने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिच्या भांगेत सिंदूर, हातात लाल चुडा दिसत होता. प्रियंकाने वेडिंग अपडेट देत ज्या अकाऊंट सोबत कोलॅब केलं होतं त्याचं नाव हरि सेवक आहे. हेच तिच्या पतीचे इन्स्टाग्राम अकाऊंट असल्याचं म्हटलं जातं. पण तिने आपल्या पतीचा फोटो दाखवलेला नाही.