प्रियांका चोप्रा साऊथ सुपरस्टार महेश बाबू सोबत ‘Globetrotter’ या मेगा ॲक्शन चित्रपटात दिसणार आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित हा प्रोजेक्ट जागतिक पातळीवर शूट होणार असून चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Mahesh Babu-Priyanka Chopra new upcoming movie Globetrotter
मुंबई - प्रियांका चोप्रा एस एस राजामौली यांच्या 'Globetrotter' मध्ये महत्वाच्या भूमिकेत असणार आहे, असे वृत्त समोर आले आहे. यामध्ये साऊथचा हँडसम अभिनेता महेश बाबू मुख्य भूमिकेत असल्याची माहिती समोर आलीय. इतकेच नाही तर पृथ्वीराज सुकुमारन एक खतरनाक विलेन 'कुंभा' च्या भूमिकेत असेल. निर्माते अमेरिकन वितरण साठी काम करत आहेत. फॅन्सना प्रियांका आणि महेश बाबू यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुकता लगून राहिली आहे.
प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली, ज्यामध्ये चित्रपटाचे शॅडो पोस्टर दिसते. पण हे अद्याप स्पष्ट नाहिये की, प्रियांका या चित्रपटात कोणत्या भूमिकेत असेल.
माहितीनुसार, निर्माते अमेरिकेत डिस्ट्रीब्यूशन विषयी बातचीत करत आहे. प्रियांकाच्या या घोषणेनंतर पृथ्वीराज सुकुमारनचा देखील पहिला लूक समोर आला आहे. शुक्रवारी राजामौलीने पृथ्वीराज यांचा फर्स्ट लूक शेअर केलाय. 'कुंभा' नावाच्या विलेनच्या भूमिकेत तो असेल. या पोस्टरमध्ये पृथ्वीराज ब्लॅक सूट, पँट आणि बूट घातलेला दिसतोय. त्याच्या व्हिलचेयरमधून चार रोबोटिक हात निघालेले दिसताहेत, जो त्याचा आणखी खतरनाक लूक दिसतोय.
दिग्दर्शक एसएस राजामौलीने इन्स्टाग्रामवर लिहिलं, "पृथ्वी सोबत पहिला शॉट घेतल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो, 'तू माझ्या आतापर्यंतचा सर्वात उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. धोकादायक, निर्दयी, शक्तिशाली खलनायक कुंभा..."
हे पोस्टर प्रियांका - महेश बाबूने देखील आपापल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केले आहेत. प्रियांका नुकताच भारतात आलीय. कदाचित 'Globetrotter' च्या शूटिंगसाठी ती आलीय. यावर्षीच्या सुरुवातीला निर्मात्यांनी एक दमदार पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यावर '#Globetrotter' लिहिलं होतं. पण त्यावेळी चित्रपटाचे टायटल कन्फर्म केलं नव्हतं. महेश बाबूने देखील आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिलं, "आपल्या प्रेमासाठी धन्यवाद...नोव्हेंबर २०२५ मध्ये तुमच्यासोबत या सादरीकरणाचा आनंद घेण्यासाठी मीही तुमच्याइतकाच उत्साहित आहे. #GlobeTrotter."
निर्मात्यांनी चित्रपटाच्या कथेबद्दल किंवा इतर कलाकारांबद्दल अधिक माहिती उघड केलेली नाही.