Preity Zinta Reaction pudhari
मनोरंजन

Preity Zinta Reaction: पंजाब किंग्जची 'ट्रॉफी' म्हणणाऱ्यांना प्रिती झिंटाचे फिल्मी अंदाजात प्रत्युत्तर... पोस्ट होतेय व्हायरल

Anirudha Sankpal

Preity Zinta Reaction: बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा ही आयपीएल संघ पंजाब किंग्जची सहमालक आहे. ती पंजाब किंग्जच्या प्रत्येक हंगामात आपल्या संघाला चिअर करण्यासाठी मैदानावर उपस्थित असते. संघाच्या प्रत्येक विजयात ती उत्साहाने सहभागी होते तर पराभवात संघाचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करत असते.

यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज लीग स्टेजमध्ये दमदार कामगिरी करत आहे. याचवेळी सोशल मीडियावर पंजाब किंग्जची मालक प्रिती झिंटाला एकप्रकारे टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रिती झिंटाने आपल्या हजरजबाबी आणि फिल्मी स्टाईलने हा प्रयत्न हाणून पाडला.

प्रिती झिंटा पंजाब किंग्जच्या सध्याची कामगिरी सेलिब्रेट करण्यासाठी एक Q&A सेशन सोशल मीडियावर आयोजिक करण्यात आला होता. त्यावेळी एका नेटकऱ्याने प्रिती झिंटाला पंजाब किंग्जची ट्रॉफी असं संबोधलं होतं. त्यावर प्रिती झिंटाने 'आभारी आहे. हे खूप गोड आहे. मात्र खरं बोलायचं झालं तर कोणत्याही महिलेला 'ट्रॉफी' होणं आवडत नाही. ट्रॉफी या मालकीच्या असतात मात्र महिला नाही. ट्रॉफी या काचेच्या शोकेसमध्ये ठेवल्या जातात आणि महिलांची जागा ही आपल्या आयुष्यात असते आपल्या ह्रदयात असते.' यानंतर 'प्रितीने फिल्मी प्रश्नाचे फिल्मी उत्तर' असे म्हणत ही गोष्ट लाईटर मोडवर नेली.

याच संभाषणावेळी प्रितीने आपल्या आगामी चित्रपटाबाबत देखील माहिती दिली. ती आगामी लाहोर १९४७ हा चित्रपट करत आहे. तिने हा प्रोजेक्ट का निवडला याचं कारण देखील सांगितलं. मला एक ऐतिहासिक चित्रपट करायचा होता. त्यामुळं मी लाहोर १९४७ साईन केला. विशेष म्हणजे हा चित्रपट माझे आवडचे दिग्दर्शक राज कुमार संतोशी दिग्दर्शित करत आहेत आणि सनीसोबत काम करणं नेहमीच आनंददायी असतं.

तिने हा चित्रपट फाळणी आणि द्वेशाच्या काळातील एक प्रेम कहाणी आहे. प्रिती लाहोर १९४७ मधून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट राज कुमार संतोशी दिग्दर्शित करणार आहेत तर याचे प्रोडक्शन आमीर खान प्रोडक्शनच्या बॅनरखाली होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT