Deool Band 2 & Shah rukh khan 
मनोरंजन

Deool Band 2 & Shah rukh khan | देऊळबंद २ साठी शाहरुख खानने केली ‘लाखमोलाची’ मदत, प्रवीण तरडेंनी केली गोष्ट उघड!

रेड चिली या शाहरुखच्या कंपनीत केले चित्रपटाचे DCP व DI चे तांत्रिक काम

पुढारी वृत्तसेवा

Deool Band 2 & Shah rukh khan प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळबंद २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात चित्रपटाने ८० कोटींहून अधिक कमाई केली असून ९० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे. या चित्रपटाच्या पाठीमागील किस्से समोर येत आहेत. नुकत्‍याच एका मुलाखतील दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चित्रपटासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने मदत केल्याचा किस्सा सांगितला आहे.

चित्रपटाचे तांत्रिक काम रेड चिली इंटरटेनमध्ये

देऊळबंद चित्रपट शूट झाला त्‍यानंतर त्‍याचे DCP व DI ही तांत्रिक काम पोस्ट प्रोडक्शनमध्ये रेड चिली इंटरटेन या शाहरुख खानच्या कंपनी मध्ये झाले तरडे यांनी सांगितले की या कामाचे बजेट १२ लाखांपर्यंत होते पण प्रत्‍यक्षात ते बील ४२ लाखांवर गेले. आता परत पैशाचा प्रश्न उभा राहिला.

शाहरुखने सांगितले ‘बिल का बादमे देखेंगे’

ही गोष्ट ज्यावेळी शाहरुख खानच्या कानवर गेली त्‍यावेळी त्‍यांनी त्‍यांच्या तंत्रज्ञानां विचारले की फिल्म कशी आहे. त्‍यावेळी तंत्रज्ञांनी सांगितले की ही फिल्म खूप चांगली आहे. पाहताना डोळयात अश्रू आले. त्‍यावेळी हा चित्रपट पाहणारे हे तंत्रज्ञ लोक हिंदी भाषिक होते पण त्‍यांनी चित्रपटाचा भाव कळाला होता. मग त्‍यांनी याचे बिल ४२ लाख झाले आहे. ते भरल्याशिवाय आम्हाला DCP देता येत नाही असे सांगितले. त्‍यावेळी शाहरुखने सांगितले चित्रपट चांगला आहे ना बिलाचे नंतर बघू असे म्हणून परवानगी दिली.

DI व DCP काय असते

चित्रपट निर्मितीच्या उत्तर-निर्मिती (Post-Production) टप्प्यामध्ये DI (Digital Intermediate) आणि DCP (Digital Cinema Package) ही दोन अत्यंत महत्त्वाची तांत्रिक कामे आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, 'DI' मुळे चित्रपट देखणा दिसतो आणि 'DCP' मुळे तो थिएटर्समध्ये दाखवला जाऊ शकतो.

शाहरुख खानचे मानले तरडे यांनी आभार

रेड चिलीमुळे हा चित्रपट चांगल्या दर्जाचा व थिअर्टसमध्ये दिसू शकला. त्‍यांनी मोठ्या मनाने पैसे नसताना चित्रपटाचे तांत्रीक काम करुन दिले याबद्दल प्रवीण तरडे यांनी शाहरूख खानचे आभार मानले. तसेच नंतर आपण हे पैसे भरले असल्याचेही त्‍यांनी स्पष्ट केले.

दरम्यान ‘देऊळबंद २’चा बॉक्स ऑफिसवरील विजयाचा प्रवास अद्यापही कायम आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर चार आठवडे उलटून देखील चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून तुफान कमाई होत आहेत. लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असे म्हटले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT