Actress Praveena Deshpande passed away  instagram
मनोरंजन

Actress Praveena Deshpande Death | सलमान खानची को-स्टार प्रवीणा देशपांडेचे निधन, कोण होती अभिनेत्री? जाणून घ्या

Praveena Deshpande Cancer Death | सलमान खानची को-स्टार प्रवीणा देशपांडे काळाच्या पडद्याआड, कोण होती अभिनेत्री, जाणून घ्या

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. काही काळापासून त्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत असून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Actress Praveena Deshpande Death

सलमान खानची सह-कलाकार अभिनेत्री प्रविणा देशपांडे यांचे कर्करोगाने निधन झाले. १७ फेब्रुवारी रोजी वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची पुष्टी केली, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, "आम्ही तुम्हाला कळवत आहोत की श्रीमती प्रविणा देशपांडे यांचे १७ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वर्गवास झाले. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार हिंदू स्मशानभूमी, चकाला पारशीवाडा, अंधेरी पूर्व येथे केले जातील. (entertainment news)

त्यांनी दीर्घकाळ मल्टीपल मायलोमा कॅन्सरशी लढा दिला. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत मोठे नुकसान झाले आहे.

प्रवीणा देशपांडे यांच्या मालिका-चित्रपट

प्रवीणा देशपांडे यांनी मराठी आणि हिंदी कलाविशवात काम केले आहे. प्रविणा देशपांडे यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. त्यांनी 'कुल्फी कुमार बाजेवाला', 'घर एक मंदिर', 'करम अपना अपना' टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले.

हिंदी चित्रपट-

'मुंबई मेरी जान', 'रेडी', 'बॉम्बे टॉकीज', 'डी-डे', 'मॉन्सून शूटआउट', 'गब्बर इज बॅक', 'अलिगढ', 'गाव', 'एक व्हिलन', 'क्रेझी कुक्कड फॅमिली', 'ब्लॅकमेल', 'गोलक बुगनी बँक ते बटुआ', 'परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण'. नीरज पांडेच्या 'तस्करी' या वेब सिरीजमध्येही त्या दिसल्या होत्या.

मल्टीपल मायलोमा म्हणजे नेमकं काय?
आपल्या शरीरातील अस्थिमज्जा रक्तपेशी तयार करते. त्यातल्या प्लाझ्मा पेशी शरीराला संसर्गांपासून वाचवण्यासाठी अटिबॉडी तयार करतात. मल्टीपल मायलोमा मध्ये या प्लाझ्मा पेशी अनियंत्रित वाढू लागतात आणि कॅन्सर पेशींमध्ये बदलतात. त्यामुळे: निरोगी रक्तपेशी कमी होतात हाडे कमकुवत होतात रोगप्रतिकारक शक्ती घटते.

लक्षणे -

  • हाडांमध्ये तीव्र वेदना (विशेषतः पाठ, कंबर)

  • वारंवार संसर्ग होणे

  • अशक्तपणा / थकवा

  • रक्तक्षय (अॅनिमिया)

  • वजन कमी होणे

  • किडनीचे त्रास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT