मनोरंजन

Mumbai Local मधून प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर एकत्र, सिद्धीविनायक चरणी पोस्टर लॉन्च

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. मुंबई लोकल या चित्रपटात प्रथमेश आणि ज्ञानदाची जोडी दिसणार आहे. या नव्या जोडीविषयी चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या टीमने सिद्धीविनायक चरणी दर्शन घेऊन या चित्रपटाची घोषणा केली.

टाईमपास, टकाटक, बालक पालक अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबनं आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. विनोदी भूमिकांसह त्याच्यातील गंभीर अभिनेत्याचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. ज्ञानदा रामतीर्थकरनं प्रामुख्यानं टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ज्ञानदाच्या सख्या रे, जिंदगी नॉट आऊट, शतदा प्रेम करावे, ठिपक्यांची रांगोळी अशा मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय धुरळासारखे काही चित्रपटही तिनं केले आहेत.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी यांनी "मुंबई लोकल" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्राची राऊत, सचिन अगरवाल सहनिर्माते असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित करणार आहेत. या चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे आदी कलाकारही आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहेत.

चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी करणार असून संकलन स्वप्निल जाधव यांचे आहे. सह दिग्दर्शक विनोद शिंदे, कलादिग्दर्शक सुमित पाटील आहेत. कार्यकारी निर्माता नीलेश गुंडाळे तर रश्मी राठी कपडेपट आहेत. संगीतकार म्हणून देव आशिष आणि हर्षवर्धन वावरे काम पाहत आहेत.

SCROLL FOR NEXT