पुढारी ऑनलाईन डेस्क - दक्षिण भारतीय दिग्दर्शक प्रशांत वर्मा सीक्वल ‘जय हनुमान’ आणत आहेत. ‘जय हनुमान’ चा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. ऋषभ शेट्टी भगवान हनुमानाच्या रुपात दिसत आहे. (Jai Hanuman Movie)
ऋषभ शेट्टीने आपल्या अधिकृत इन्स्टा हँडलवर ‘जय हनुमान’चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये ऋषभ हा भगवान हनुमानच्या अवतारात दिसत आहे आणि ऋषभच्या हातात भगवान श्री राम यांची प्रतिमा दिसत आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये ऋषभ शेट्टीने लिहिलं- त्रेतायुगचे एक व्रत, जे कलियुगमध्ये नक्की पूर्ण होईल. आम्ही निष्ठा, साहस आणि भक्तीभावासोबत एक महाकाव्य प्रस्तुत करत आहे. दिग्दर्शक प्रशांत वर्मा आणि निर्मात्यांना सहकार्य करून खूप खुश आहे. (Jai Hanuman Movie)
सोशल मीडियावर जय हनुमान चित्रपटातील ऋषभ शेट्टीचा लूक व्हायरल होत आहे. लवकरच रिलीज डेट जाहीर होईल, असे म्हटले जात आहे.