हे केवळ प्रेमामुळे शक्य...तितकंच प्रेम; प्राजक्ताचा 'फुलवंती' ओटीटीवर  Instagram
मनोरंजन

हे केवळ प्रेमामुळे शक्य...तितकंच प्रेम; प्राजक्ताचा 'फुलवंती' ओटीटीवर

Prajakta Mali : हे केवळ प्रेमामुळे शक्य...तितकंच प्रेम; प्राजक्ताचा 'फुलवंती' ओटीटीवर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या 'फुलवंती' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटातील अभिनयासोबत तिच्या भारदस्त नृत्य कौशल्य आणि अदाकारीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलंय. याच दरम्यान प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंदाची माहिती दिली आहे. यात तिने चाहत्यांनी 'फुलवंती' ला दिलेल्या प्रेमाखात त्याचे भरभरून आभार मानत हा चित्रपट ॲमेझान प्राईमवर पाहायला मिळत असल्याचे सांगितले आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सुत्रसंचालन मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या करत आहे. नुकतेच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांचे आभार मानत 'फुलवंती' हा चित्रपट ओटीटीवर आला असल्याची माहित दिली आहे. प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. या माहितीमुळे चाहत्याचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

''तुम्हा सगळ्यांच्या प्रेमळ प्रतिसादामुळे फुलवंती च आज #७ व्या आठवड्यात पदार्पण होतय. आणि याच निमित्ताने आपला चित्रपट फुलवंती आजपासून Amazon Prime वर सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे😇. चित्रपटगृहात चित्रपट चालू असताना OTT Platform वर इतका उदंड प्रतिसाद मिळणे, हे केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं. फुलवंतीवर जितक प्रेम तुम्ही चित्रपटगृहात केलत, तितकंच प्रेम या माध्यमात देखील कराल याची खात्री आहे🥰.''

प्राजक्ताचा 'फुलवंती' हा चित्रपट सिनेमागृहासोबत ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. यामुळे प्राजक्ताने सर्वाचे आभार मानले आहे. 'फुलवंती' हा चित्रपट रिलीज होवून आता ७ वा आठवडा पार पडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT