अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने अलीकडेच तिचा साखरपुडा झाल्याची बातमी शेयर केली होती. यादिवशीचा सुरेख असा लूक आणि व्हीडियोही तिने शेयर केला होता. यानंतर तिला चाहत्यांकडून लग्नाची तारीख कधी अशी विचारणाही होत होती. पण आता प्राजक्ता लग्नाच्या बेडीत कधी अडकणार याबाबत तिने स्वत:च पोस्ट शेयर केली आहे. (Latest Entertainment News)
प्राजक्ताने सोशल मिडियावर एक व्हीडियो शेयर केला आहे. यामध्ये तिने लग्नाची पत्रिका शेयर केली आहे. लग्नपत्रिका पूजन असा हॅशटॅग देत त्याने हा व्हीडियो शेयर केला आहे. यात लग्नपत्रिका, गुलाबाच्या पाकळ्या, हळद कुंकू दिसत आहे.
कोण आहे प्राजक्ताचा भावी पती?
शंभुराज खुटवड असे प्राजक्ताच्या भावी पतीचे नाव आहे.
कधी आहे प्राजक्ता गायकवाडचे लग्न?
प्राजक्ता आणि शंभूराजचे लग्न 2 डिसेंबर 2025 रोजी आहे.
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील येसुबाई या व्यक्तिरेखेने प्राजक्ताला प्रसिद्धी दिली. यानंतर प्राजक्ता आई माझी काळूबाई या मालिकेत दिसली होती. पोस्टमधून तिने लग्नासंबंधीच्या चर्चांची हिंट दिली होती. यामध्ये तिने काही फोटो शेअर केले होते. पाहुणे मंडळी ९६ कुळी मराठा असे हॅशटॅग तिने यावेळी शेअर केलेल्या पोस्टमधून दिले होते. त्यावेळी अनेकांनी प्राजक्ताचा कांदेपोह्यांचा कार्य्रक्रम असल्याची शंकाहि व्यक्त केली होती तर काहींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावही केला होता.