मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लग्नानंतर अभिनय क्षेत्रात दमदार कमबॅक करत असून, ‘भिडेवाडा’ या मालिकेत ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहे. समाजसुधारणा, स्त्री शिक्षण आणि संघर्षाचे प्रतीक असलेल्या या भूमिकेमुळे प्राजक्ताच्या करिअरला नवी दिशा मिळणार असून, प्रेक्षकांमध्येही या भूमिकेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Prajakta Gaikwad will role play in Bhidewada movie
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लग्नानंतर काही काळ अभिनयापासून दूर राहिलेल्या प्राजक्ताने आता दमदार कमबॅक करण्याचा निर्णय घेतला असून, ती ‘भिडेवाडा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ऐतिहासिक आणि प्रेरणादायी भूमिका साकारणार आहे.
महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेला ‘भिडेवाडा’ विशेष आहे. कारण ही वास्तू केवळ दगड-मातीची रचना नाही तर एका क्रांतीची साक्ष देतात. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी याठिकाणीच देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. हाच ऐतिहासिक ‘भिडेवाडा’ आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
‘भिडेवाडा’ समाजसुधारणेच्या काळावर आधारित असून, त्या काळातील संघर्ष, विचारधारा आणि बदलते समाजचित्र दाखवणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेतून स्त्री शिक्षणाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे.
स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक संघर्षाची आणि परिवर्तनाचा साक्षीदार भिडेवाडा ठरला आहे. या वास्तूच्या प्रेरणादायी वारशातून जन्मलेली एका तरुणीच्या जिद्दीचा, स्वप्नांचा आणि संघर्षाचा प्रवास चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.
चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
शिवमुद्रा स्टुडिओज निर्मित आणि राघो फिल्म प्रस्तुत ‘भिडेवाडा’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवानी राजेशिर्के आणि अजित शिरोळे यांनी केले आहे. निर्मिती जयश्री शिरोळे, कावेरी जावळे तर सुप्रिया शिंदे, वैभव जोशी आणि राजू विटकर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
'भिडेवाडा'तील कलाकार
या चित्रपटात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तर महात्मा जोतिराव फुले यांची भूमिका धीरेश जोशीने साकारली आहे. शिवाय माधव अभ्यंकर, वैभव चव्हाण, ऋतुराज वानखेडे, नेहा सोनावणे, सम्राट शिरोळे, शरा गायकवाड, प्रदीप कोथमीरे, आनंद पिंपळकर, समद खान, प्रतिभा भगत, श्रीराम पेंडसे, निखिल निगडे, योगेश तनपुरे, पंकज चव्हाण, अनिरुद्ध देशपांडे हे कलाकार आहेत.
चित्रपटाची कथा अजित शिरोळे यांची असून पटकथा अजित शिरोळे अक्षय कट्टी यांची आहे. संवाद अक्षय कट्टी, गीत ईश्वर अंधारे यांनी लिहिली आहेत. संगीत सागर शिंदे, संकलन राजेश बारबोले, छायांकन योगेश कोळी, कलादिग्दर्शन महेश गोरे यांचे आहे. ध्वनी अशोक झुरुंगे यांचे आहे. कार्यकारी निर्माते अमित माझीरे आहेत.