पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार प्रभास आगामी चित्रपट ‘कन्नप्पा’ मध्ये वेगळ्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचा (Kannappa Teaser) टीजर रिलीज धाला आहे. सोबत बॉलिवूड स्टार अक्षय कुमार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘कन्नप्पा’ मल्टीस्टारर साऊथ इंडियन चित्रपट आहे. या चित्रपटाचा टीजरची प्रतीक्षा संपली असून साऊथचे अनेक स्टार्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विष्णु मांचू देखील महत्त्वाच्या भूमिकेत असेल. टीजरमध्ये या चित्रपटाची झलक पाहायला मिळत आहे.
‘कन्नप्पा’चा १ मिनिट २५ सेकंदाचा टीजर रिलीज झाला आहे. त्याची सुरुवात एका आवाजाने होते. त्यामध्ये ऐकू येतं की, ‘संकट का समय हमारे बहुत निकट आ पहुंचा है, शत्रु यमदूतों की तरह हमारे कबीले का नाश करने आ रहे हैं…’
चित्रपट निर्माते, अभिनेते विष्णु मांचू एक यौद्धाच्या भूमिकेत असणार आहे. अक्षय कुमार भगवान शिव आणि काजल अग्रवाल माता पार्वती यांच्या अवतारात दिसणार आहेत. शेवटी प्रभासची एन्ट्री दाखवण्यात आलीय.