पॉलोमी दास बिग बॉस ३ शोतून बाहेर पडणार असल्याची माहिती मिळतेय Poulomi Polo Das Instagram
मनोरंजन

Bigg Boss OTT 3 मधून तिसरी स्पर्धक घराबाहेर?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : २२ जूनला बिग बॉसचा शो सुरु झाला आणि पहिल्या १० दिवसात जवळपास ३ स्पर्धक घराबाहेर झाले. हा सीझनचा तिसरा एविक्शन आणि दुसरा मिड वीक एविक्शन होता. यामध्ये पॉलोमी दास बाहेर झालीय. सध्या हा हे एपिसोडमध्ये दाखवलेलं नाही. पण रिपोर्टनुसार, ती एलिमिनेट झाली आहे.

बिग बॉस ३ शोचे तिसरे एलिमिनेश झाले आहे. यावेळी पॉलोमी दास घरातून बाहेर झाली आहे, अशी माहिती समोर आलीय. शोतून बाहेर पडणारी ही तिसरी स्पर्धक आहे. याआधी नीरज गोयत, पायल मलिकदेखील एलिमिनेट झाले आहेत.

‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये पहिल्या वीकेंड का वारमध्ये अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक घराबाहेर गेली होती. आता आणखी एक स्पर्धकाचे एलिमिनेशन झाले आहे. असं म्हटलं जात आहे की, नॉमिनेशन टास्कमध्ये ज्या ६ लोकांना नॉमिनेट केलं गेलं होतं, त्यापैकी एकाचे एलिमिनेशन झाले आहे.

असं म्हटलं जात आहे की, पॉलोमीने स्वत: ला नॉमिनेट केलं होतं. बिग बॉसने घरच्यांना एक टास्क दिला होता. त्यामध्ये दोन लोकांच्या आपापसात सहमतीने दोन स्पर्धकांपैकी एकाला नॉमिनेट करायचं होतं. पॉलोमी आणि मुनीषाला सना सुल्तान-लव कटारिया पैकी एक निवडायचं होतं. दोघे एका निर्णयालर येऊ शकले नाहीत. तेव्हा पॉलोमीने सनाला वाचवण्यासाठी स्वत: ला नॉमिनेट केलं आणि शोतून बाहेर गेली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT