पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूडमधील एक अत्यंत संवेदनशील आणि मनाला भिडणारी फिल्म 'पीकू' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेली हा सुपरहिट चित्रपट पुन्हा एकदा ९ मे २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (Irrfan Khan)
दीपिका पादुकोणने या खास रि-रिलीजची माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका भावनिक व्हिडिओच्या माध्यमातून दिली. त्या व्हिडिओमध्ये ‘पीकू’मधील काही खास क्षण, संवाद आणि आठवणी पुन्हा जागवण्यात आल्या आहेत. या पोस्टमध्ये दीपिकाने इरफान खानला श्रद्धांजली वाहताना लिहिलं, “एक फिल्म जी नेहमीच माझ्या हृदयात राहील... ‘पीकू’ १०वी ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी ९ मे २०२५ ला पुन्हा मोठ्या पडद्यावर येतेय! इरफान, आम्ही तुला खूप मिस करतो आणि तुझी कायम आठवण येते...” (Piku Re-release)
दीपिकाच्या पोस्टने इरफानच्या चाहत्यांना भावूक केलं. त्यांनी लिहिलं, "इरफान, आम्ही तुला खूप आठवण करतो...आणि नेहमी करत राहू." लोक कॉमेंट्समध्ये इरफानला श्रद्धांजली देताना दिसले. (Piku Re-release)