Indian Idol 12 Winner Pawandeep Rajan sing a song video viral
मुंबई : Indian Idol 12 विजेता पवनदीप राजनचा अपघातानंतर रुग्णालयातून सुरेल व्हिडिओ व्हायरल होत आहे. इन्स्टा स्टोरीवर एक फोटो देखील आहे, ज्यामध्ये तो बुद्धिबळ खेळताना दिसतो. यानंतर फॅन्स तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत आहेत.
एका कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या पवनदीपला गाताना पाहून फॅन्सना दिलासा मिळाला आहे. त्याची टीम हेल्थ अपडेट्स शेअर करत आहे. दुसरीकडे, पवनदीपने स्वत: इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीय. ज्यामध्ये तो रुग्णालयाच्या स्टाफ सोबत बुद्धिबळ खेळताना दिसत आहे. त्याने लिहिलं– “रिकव्हरी मोड ऑन, आपल्या आशीर्वादासाठी धन्यवाद.”
video- necropolis_028 insta वरुन साभार
याशिवाय, पवनदीपचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो रुग्णालयात बेडवर बसून गाणे गाताना दिसत आहे. सुरांचा गोडवा पाहून पवनदीपच्या फॅन्सचा जीव भांड्यात पडला आहे. एका युजरने म्हटलं की ‘लवकर ठिक हो भाऊ.’ दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘तुम्ही खूप स्ट्राँग आहात सर, गेट वेल सून.’
भीषण कार दुर्घटनेत पवनदीप गंभीर जखमी झाला होता. हा अपघात ५ मे, २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जवळ झाला. त्याची कार रस्त्यावर उभारलेल्या एका कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातात पवनदीप गंभीर जखमी झाला होता. सोबतच कारचा देखील चक्काचूर झाला होता. पण अनेक शस्त्रक्रियेनंतर पवनदीपच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.