शरयू सोनवणे आपल्या आहाराबद्दल काय सांगते पाहा Instagram
मनोरंजन

Paru | 'पारू' स्वत:ला कशी ठेवते फिट, जाणून घ्या

Sharayu Sonawane | "मी हलकं -फुलकं आणि सहजपणे पचेल असाच आहार घेते" - शरयू सोनवणे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - फास्ट फूड आणि जंक फूडच्या या जगात निरोगी आणि सकस आहार आव्हानात्मक वाटू शकत. परंतु खऱ्या, नैसर्गिक घटकांनी शरीराचे पोषण करणे वाढत्या वयासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. फास्ट फूड पेक्षाही, सकस आहार ही एक जीवनशैली आहे जी काम करायला अधिक ऊर्जा देते. कलाकार कसे आपल्या आहाराची काळजी घेतात याची उत्सुकता तुम्हालाही असेल. सर्वांची लाडकी पारू म्हणजेच शरयू सोनावणे हिने शेयर केलाय आपला दिवसाचा आहार.

"मी जास्तकरून हलकं-फुलकं आणि सहजपणे पचेल असाच आहार घेते. मी सकाळी उठल्यावर भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाते. त्यानंतर जिरापाणी किंवा नारळपाणी पिते. मग सेटवर येऊन पोहे, उपीट, इडली किंवा ऑम्लेट ब्रेड असा काहीतरी ब्रेकफास्ट करते. त्यानंतर एखादं फळ जसं संत्र, सफरचंद, मस्कमेलन, कलिंगड किंवा किवी. सकाळचा नाष्टा झाल्यानंतर मधल्या वेळेत म्हणजे सकाळी ११ ते १२:३० मध्ये सॅलड खाते आणि त्यानंतर मी सरळ दुपारी जेवते. दुपारच्या जेवणात एक भाकरी आणि कुठलीही भाजी त्याच्याजोडीला दही. कधी फारच मन केलं तर डाळ खिचडीमध्ये इंद्रायणी भात खाते. लंचनंतर सूर्यास्ता पर्यंत मखाना, चणे - शेंगदाणे किंवा ड्रायफ्रुट्सचे लाडू खाते आणि यासोबत माझं दिवसभराचं खाणं संपत. आधी मी संध्याकाळी ७ वाजता जेवायचे.

दुपारी जेवण झालं त्यानंतर पौष्टिक आणि हलके स्नॅक्स घेते. कारण सूर्यास्त झाला कि आपली पाचन शक्ती मंद होते. मी दिवसभरात २.५ ते ३ लिटर पाणी पिते आणि उन्हाळ्यात ताक आणि सब्जाचे पाणी घेते. शक्यतो घरचंच खाल्लं पाहिजे. कधीतरी बाहेरचं खाऊ शकतो, जसे मी जेव्हा घरी सुट्टीसाठी जाते, तेव्हा माझ्या मनाला येईल ते मी खाते. पण पुन्हा 'पारू"च्या सेटवर आले की, नेहमीचा नित्यक्रम पाळते. जर तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही आपले काम चांगल्या प्रकारे करू शकता."

"पारू" रोज संध्याकाळी ७:३० वा झी मराठीवर पाहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT