परिणीती चोप्राने राघव चड्ढासाठी शेअर केलेली प्रेमळ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तर प्रियांका चोप्राने दोन वर्षांपूर्वीचा जुना फोटो शेअर करत बहिणींबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. दोन्ही बहिणींचं नातं आणि परिणीती-राघवचं प्रेम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
priyanka chopra wish for jiju raghav chadha
मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेता राघव चड्ढा यांच्या लग्नानंतर ही जोडी सतत चर्चेत असते. नुकतंच परिणीतीने आपल्या सोशल मीडियावर राघवसाठी एक प्रेमळ पोस्ट शेअर केली असून, ती काही क्षणांतच व्हायरल झाली आहे. निमित्त होतं राघव यांचा वाढदिवस.
परिणीती चोप्राचे पती, राजकीय नेते राघव चड्ढा आज ११ नोव्हेंबर रोजी आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरम्यान, परिणीतीने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी बर्थडे पोस्ट शेअर केला आहे. दरम्यान, प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर भावोजी राघव चड्ढाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच परिणीती सोबतचा तिच्या लग्नातील विधीचा एक फोटो शेअर केला आहे.
परिणीतीने पोस्टमध्ये काय लिहिलं?
'जेव्हा मला वाटले की तुम्ही यापेक्षा परिपूर्ण होऊ शकत नाही - तेव्हा तुम्ही जगातले सर्वोत्तम बाबा बनता. मी तुम्हाला आमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी पाहते - एक परिपूर्ण मुलगा, एक परिपूर्ण पती आणि एक परिपूर्ण वडील म्हणून. मी तुम्हाला कठोर परिश्रम करताना (कधीकधी खूप कठीण!) पाहते, काम आणि कुटुंबाचे संतुलन राखताना. तुम्ही माझी प्रेरणा, माझा अभिमान, माझा जीव आहात....मी देवाला लाखो वेळा विचारते - मी असे काय केले की तुम्ही मला मिळालात? माझ्या जगण्याचं कारणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुमच्याशिवाय खरोखर अस्तित्वात राहू शकत नाही.'
प्रियांका चोप्राने राघव चड्ढा यांना इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी प्रियांकाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर राघव - परिणीतीच्या साखरपुड्याचा एक फोटो शेअर केला आहे. प्रियांकाने लिहिलं, 'हॅप्पी बर्थडे @raghavchadha88! तुमच्यासाठी येणारे वर्ष आरोग्यदायी, आनंद आणि छोट्या मुलांसोबत नव्या ॲडव्हेंचरने भरलेला राहो. @parineetichopra'