Panchayat Season 5 pudhari
मनोरंजन

Panchayat Season 5: पंचायत 5 साठी तयार आहात? मेकर्सनी जाहीर केली नव्या सीझनची तारीख

पंचायतच्या चौथ्या सीझनमध्ये फुलेरात निवडणुकीचे वारे वाहिले होते

अमृता चौगुले

पंचायत 4 चा आनंद संपत नाही तोवर मेकर्सनी चाहत्यांसाठी पर्वणी आणली आहे. नुकताच मेकर्सनी पंचायत सीझन 5 ची घोषणा केली आहे. मागील चारही सीझन निखळ मनोरंजन करणारे फुलेरावासी आता पुन्हा एकदा चाहत्यांना हसवण्यासाठी सज्ज आहेत. चौथ्या सीझनमध्ये फुलेरात निवडणुकीचे वारे वाहिले होते. या निवडणुकीत क्रांति देवी विजयी झाल्या होत्या. तर मंजूदेवी यांना मात्र अपयशाचे फळ चाखावे लागले.

पंचायत सीझन 4 ने अमेरिका, कनाडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन आणि युएई मधील 42 देशातील टॉप 10 मध्ये स्थान पटकावले होते.

प्राइम व्हीडियोने नुकतीच घोषणा केली की पंचायत सीझन 5, 2026 मध्ये रिलीज होणार आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते. फुलेरा येण्याची तयारी सूरु करा... पंचायतचा नवा सीझन लवकरच!..

कधी येणार 5 वा सीझन

प्राइम व्हीडियोने जाहीर केले आहे की पंचायत सीझन 5 वर काम सुरू केले आहे. 2026 मध्ये त्याचा प्रीमियर होणार आहे. या शोचा पहिला सीझन 2018 मध्ये आला होता. 2023 मध्ये या सिरिजचा दूसरा सीझनला 54 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचा बेस्ट वेबसिरिजचा अवॉर्डपण मिळाला होता.

पाचव्या सीझनमध्ये काय असणार?

पंचायत सीझन 4 हा 180 पेक्षा जास्त देशांमध्ये पाहिला गेला. मागच्या आठवड्यातही या सिरिजची दर्शकसंख्या उत्कृष्ट होती. आता आगामी सीझनमध्ये क्रांति देवी आणि बनराकस यांची जोडी फुलेरामध्ये काय धमाल करते तसेच मंजू देवी आणि त्यांच्या समर्थकांना कसे जेरीस आणते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

का ठरली आहे पंचायत अनेकांची आवडती?

ग्रामीण भारताचे खरेखुरे चित्र या सिरिजने प्रेक्षकांसमोर उभे केले आहे. यातील प्रत्येक पात्राचा खरेपणा मनाला स्पर्शून जातो आहे. तसेच कोणत्याही चकचकीत उभारणीशिवाय यातील सहज जोडला जाणारा कंटेट आणि सहकुटुंब पाहता येणारी सिरिज म्हणून पंचायतने इतरांना मागे टाकले आहे.

कोण कोण आहेत पंचायत 5 चा हिस्सा?

जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुवीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सानविका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवर, अशोक पाठक आणि पंकज झा हे या सीझनचा हिस्सा असतील. ही सिरिज अक्षत विजयवर्गीय आणि दीपक कुमार मिश्रा यांनी दिग्दर्शित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT