मुंबई - बहुचर्चित सीरीज ‘पंचायत सीजन 4’ रिलीज झालयानंतर प्रेक्षकांनी त्यांना हा सीजन कसा वाटला, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘पंचायत सीजन ४’ वरून सोशल मीडिया अकाऊंटवर लोकांनी मीम्स शेअर केले आहेत. जे पाहून तुम्ही हसून लोटपोट व्हाल.
डोनाल्ड टॅम्प (Donald J. Trump) यांच्या नावाने सोशल मीडियावर अकाऊंटवर एक मीम्स शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये लिहिण्यात आलंय- ''आम्ही फुलेरामध्ये यशस्वीरित्या सत्ता बदलली आहे, प्रधानजींची अराजकता संपवली आहे. बनरकास यांना विजयाबद्दल अभिनंदन. फुलेराला पुन्हा महान बनवा.'' ही मीम शेअर करताना मीमरने 'जलवा है बनारकस भाई का' अशी कॅप्शन लिहिली आहे.
तर नितीश या युजरने मजेशीर मीम्स शेअर केले आहे. लग्नसोहळ्यात मद्यपान केल्यानंतर आत्याचा नवरा असा वागतो, असं कॅप्शन देत त्याने सचिवजींचा डायलॉग शेअर केला आहे.
रेडीटवर रिषभ या युजरने तर थेट राहुल गांधीवरच मीम शेअर केलंय. यात त्याने म्हटलंय की, क्रांतीदेवीही निवडणूक जिंकू शकतात, पण राहुल गांधींसाठी निवडणूक जिंकणे निव्वळ अशक्य आहे.
पंचायत सीरीजचे जबरदस्त फॅन फॉलोईंग असणारा एक वेगळा वर्ग आहे. अधिकतर लोक चौथ्या सीजनचे कौतुक करत आहेत. युजर्सनी कलाकारांच्या अभिनय आणि कहाणीचे कौतुक देखील केलेले आहे.
सीजनमध्ये जी लव्ह स्टोरी दाखवण्यात आलीय, तिचेदेखील कौतुक होत आहेत. तर काही युजरने शो तील काही सीन बोरिंग असल्याचे म्हटले आहे.
चाहत्यांचं म्हणणं काहीही असलं तरी मीम्सचा महापूर काही थांबलेला नाही. लोकांना सामोरे जाण्याच्या दोनच पद्धती असतात असं कॅप्शन देत बिहार से बानी या अकाऊंटवरून दुधी आणि बांबू याचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
एका मीममध्ये खूपच भन्नाट आहे. फुलेरातल्या बनराकसने प्रधानजींवर पाळत ठेवण्यासाठी सहकाऱ्याला पाठवले असते. प्रधानजींच्या घराबाहेर पाळत ठेवून असलेल्या सीनचा स्क्रीनशॉट एकाने शेअर केला आहे. फुलेराचा जेम्स बाँड असं कॅप्शन युजरने दिले आहे.
अनेक युजर्स एक्स अकाऊंट आणि इन्स्टाग्रामवर मीम्स देखील शेअर करत आहेत. एका युजरने म्हटलं- दूर हो गई टेंशन. तर अन्य युजर्स शोचे विविध सीन्स शेअर करत कौतुक केले आहे आणि अनेकांनी म्हटलंय की, ‘पंचायत सीजन 4’ पाहून त्यांचे टेन्शन कमी झालं. एकंदरित चाहत्यांमध्ये सीरिजविषयी मतमतांतर असले तरी पंचायत 4 ची सोशल मीडियावर चांगलीच हवा झाली आहे.