Panchayat 4 Cast Fees
मुंबई - आता सर्वांना 'पंचायत'चा पुढचा सीझन परत येण्याची उत्सुकता आहे. या सीरीजचा नवा सीझन २४ जून २०२५ रोजी परत येणार आहे. २०२० मध्ये अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाल्यानंतर 'पंचायत' भारतातील सर्वाधिक पसंती मिळालेल्या सीरीजपैकी एक बनली. या शोचा प्रत्येक सीझन प्रेक्षकांना खूप आवडला. या सीरीजमधील कलाकारांना किती फी मिळाली, जाणून घेऊया...
रिपोर्ट्सनुसार, 'पंचायत'चा प्रमुख जितेंद्र कुमार, जो या शोमध्ये 'अभिषेक त्रिपाठी' उर्फ 'सचिव जी'ची भूमिका साकारतो, तो पंचायत सीझन ४ साठी प्रति एपिसोड ७०,००० रुपये इतका मोठा मानधन घेतो.
रिपोर्ट्सनुसार, जितेंद्र संपूर्ण सीझनसाठी ५.६ लाख रुपये कमवेल. सध्या जितेंद्र कुमारचे नेमके मानधन अद्याप किती हे समजलेले नाही.
अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी पंचायत सीझन ३ मध्ये 'मंजू देवी' या भूमिकेने चाहत्यांची मने जिंकली. यासाठी प्रति एपिसोड सुमारे ५०,००० रुपये फी मिळाली आहे, ज्यामुळे त्यांचे एकूण मानधन ४ लाख रुपये होईल.
प्रति एपिसोड ४०,००० रुपये फी घेत आहे. यानुसार, पंचायत सीझन ३ मध्ये त्याने एकूण ३.२ लाख रुपये कमावले.
'विकास शुक्ला'ची भूमिका साकारणाऱ्या चंदन रॉयला प्रत्येक एपिसोडसाठी २०,००० रुपये इतकी मोठी रक्कम मिळेल. चंदनला पंचायतकडून एकूण १.६ लाख रुपये मिळतील.
प्रल्हादची भूमिका साकारणाऱ्या फैसल मलिकला प्रत्येक एपिसोडसाठी २०,००० रुपये, म्हणजेच एकूण १.६ लाख रुपये मिळतील.