पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानी टिकटॉक स्टार इम्शा रहमानचा एक प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर तिने आपले सोशल मीडिया अकाऊंट डिॲक्टिवेट केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लिक झाला. सोशल मीडियावर हा खूप चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेनंतर इम्शाला खूप टीका आणि धमक्यांना सामोरं जावं लागलं.
इम्शाने आपले इन्स्टाग्राम आणि टिकटॉक अकाऊंट डिॲक्टिवेट केलं आहे. तिने एका भावनात्मक नोटमध्ये लिहिलं, सोशल मीडियावर सातत्याने होत असलेल्या टीकेमुळे ती चिंतेत होती.
याप्रकरणी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींनी या घटनेवर टीका केली. तर काहींनी त्याला जाणूनबुजून स्टंट केल्याचे सांगितले. इम्शाने या घटनेवर टिप्पणी करत म्हटले की, डिजिटल युगात इंटरनेटमुळे अशा समस्यांचा सामना करावा लागतो की, त्यामुळे आपले खासगी जीवनावर खूप प्रभाव पडतो.