पाकिस्तानी अभिनेत्री हुमेरा असगर हिचे निधन झाले आहे. हुमेरा हिचा मृत्यू दोन आठवड्यांपूर्वीच झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी तिचा मृत्यू होऊनही तिच्या शेजाऱ्यांना याबाबत कल्पना नव्हती. ती 35 वर्षांची होती.
रिअलिटी शो तमाशा घर आणि जिलेबी या सिनेमांमुळे ती ओळखली जात होती. पोलिसांना जेव्हा तिचा मृतदेह सापडला तो पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. उप महानिरीक्षक सैयद असद रजा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पोलिस जेव्हा दुपारी 3 वाजता तिच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी बराच वेळ दायर वाजवले. दार उघडले न गेल्याने दरवाजा तोडला गेला. त्यावेळी हुमेरा मृतावस्थेत आढळली.
तिचा मृत्यू होऊन बरेच दिवस झाल्यासारखे वाटत होते. मृत व्यक्तीचे अंदाजे वय 30 ते 35 मध्ये असावे. ती गेली सात वर्षे एकटीच रहात होती
तीव्र दुर्गंध येऊ लागला तसेच शेजारी कोणतीच हालचाल न दिसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले होते.
पोलिस सध्या अधिक तपास करत आहेत. त्यांनी तिचा मृतदेह मेडिकल कॉलेजला पोस्ट्मॉर्टेमसाठी पाठवला आहे. एकंदरीत परिस्थिति पाहता हुमेराचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे दिसून येत आहे. पण खरे कारण मेडिकल रिपोर्ट समोर आल्यावरच स्पष्ट होईल.
हुमेरा रहात असलेल्या फ्लॅटचे भाडे बरेच वर्षे थकल्याने तिच्या घरमालकाने कायदेशीर अॅक्शन घेत तिला नोटिस पाठवली होती. या कारवाईसाठी संबंधित आल्यावर हुमेराचा मृतदेह आढळून आला. हुमेरा अभिनेत्री, मॉडेल आणि फिटनेस फ्रीक होती. मागील वर्षी सप्टेंबरनंतर ती सोशल मिडियावर फारशी अॅक्टिव नव्हती.