Web Series Movies To Watch On Weekend July 2025
मुंबई : बाहेर मस्त पाऊस सुरू आहे. या वातावरणात घरीच थांबणार असाल तर ओटीटीवर मनोरंजनाची पर्वणी तुमची वाट पहात आहे. अॅक्शन, थ्रिलर, देशभक्ती, कॉमेडी असे वेगवेगळे पद्धतीचा सिनेमा आणि सिरिज या वीकएंडला तुमची वाट पहात आहे. जाणून घेऊया कोणत्या ओटीटी चॅनल वर यावेळी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे.
रंगीन : एका प्रामाणिक नवऱ्याला जेव्हा समजते की त्याच्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीशी अफेअर आहे तेव्हा त्याच्या मनस्थितिवर होणारा परिणाम तसेच त्यातून हायप्रोफाइल एस्कॉर्ट बनण्याचा निर्णय घेतो. तेव्हा त्याचा हा प्रवास रंगीनमध्ये दिसतो आहे. यात विनीत कुमार सिंह मुख्य भूमिकेत आहे तर राजश्री देशपांडे त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. याशिवाय तारुक रैना आणि शिबा चढ्ढा हे देखील यात दिसत आहेत. रंगीन प्राइम व्हीडियोवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
सरजमीन : ऑगस्ट महिना लागला की आपल्यापैकी बहुतेकजणांना देशभक्तिचा फिवर येतो. अशांसाठी सरजमीन हा बेस्ट ऑप्शन आहे. एका सैन्य अधिकाऱ्याचा मुलगा जेव्हा आतंकवादी गटात सामील होतो त्यावेळी त्याच्या कुटुंबात आणि प्रोफेशनल आयुष्यात होणारे बदल आणि परिणाम हे सरजमीनमध्ये पाहता येतील. इब्राहीम अली खान या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येतो आहे. याशिवाय या सिनेमात पृथ्वीराज सुकुमारन आणि काजोल देखील आहेत. हा सिनेमा जियोहॉटस्टारवर पाहता येईल.
मंडला मर्डर्स: वाणी कपूरची हटकी भूमिका असलेला सस्पेंस थ्रिलर सिरिज या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रहस्यमयी शहर चरणदासपुर येथे होत असलेल्या भीषण हत्येचा तपास करण्यासाठी वाणी या ठिकाणी जाते त्यावेळी घडणाऱ्या रहस्यमयी घटना या सिरिजला अधिक रंजक बनवतात. ही सिरिज नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
सौंकण सौंकणय 2: सौंकण सौंकणय या सिनेमाचा सिक्वेल हा सिनेमा आहे. 2022 मध्ये हा सिनेमा आला होता. दोन पत्नी असलेल्या निर्मलची ही गोष्ट आहे. या मध्ये नवा ट्विस्ट येतो, जेव्हा एक इटालियन महिला निर्मलची तिसरी पत्नी म्हणून समोर येते. यामुळे सिनेमात काय काय मजेदार घटना घडतात हे पाहण्यासाठी झी 5 वरील हा सिनेमा जरूर पहा. या सिनेमात अॅमी विर्क, सरगून मेहता आणि निमरत खैरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हॅप्पी गिलमोर 2 : अॅडम सँडलर याची मुख्य भूमिका असलेल्या हॅप्पी गिलमोर या सिनेमाचा हा दूसरा पार्ट आहे. रिटायर गोल्फ खेळाडू हॅप्पी गिलमोर याच्यावर हा सिनेमा बेतला आहे. जो आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करण्यासाठी पुन्हा गोल्फ कोर्टवर उतरतो. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
ट्रीगर: हा एक अॅक्शन कोरियन ड्रामा आहे. एक शस्त्र विक्रेता आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी यांना अवैध शस्त्रास्त्रे गनफ्री साऊथ कोरियामध्ये दिसतात तेव्हा त्याच्या मुळाशी जाण्यासाठी ते एकत्र येतात. हा अॅक्शन ड्रामा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.