पुढारी ऑनलाईन
जगातील मोठ्या अॅवॉर्डस्पैकी एक म्हणजे ऑस्कर पुरस्कार. या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी काही ना काही खास असते. नुकतीच या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर झाली आहेत आणि यंदाही या सोहळ्यात काही खास असणार आहे. ते म्हणजे यावेळीपासून चाहत्यांनाही या पुरस्कार सोहळ्यात आवडत्या चित्रपटासाठी मतदान करता येणार आहे. लोकप्रिय चित्रपटासाठी हे अॅवॉर्ड असेल. त्यासाठी चाहत्यांना ट्विटरवरून मतदान करता येईल. ऑस्कर सोहळ्याचे टी.व्ही. रेटिंग घटत असताना चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आयोजकांनी हे पाऊल उचलले आहे. 27 मार्च रोजी 94 व्या ऑस्कर पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पुरस्कारांमध्ये भारतीय माहितीपट 'द रायटिंग विथ फायर'लादेखील नामांकन मिळाले आहे.