अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ Twitter
मनोरंजन

Dame Maggie Smith : दोन ‘ऑस्कर’ जिंकणा-या ‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील अभिनेत्रीचे निधन

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Dame Maggie Smith Death : 'हॅरी पॉटर' आणि 'डाऊन्टन ॲबे' या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचे निधन झाले आहे. या अभिनेत्रीने वयाच्या 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ही दु:खद बातमी चाहत्यांना देताना त्यांच्या कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला आहे.

डेम मॅगी स्मिथ या ब्रिटिश रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेत्रीने होत्या. त्यांनी दोन ऑस्कर पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. 1970 मध्ये 'द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी'साठी आणि 1979 मध्ये 'कॅलिफोर्निया सूट'साठी दुस-यांदा ऑस्कर पुरस्कार जिंकला.

अभिनेत्रीच्या मुलाने दिली निधनाची माहिती

टोबी स्टीफन्स आणि ख्रिस लार्किन यांनी सोशल मीडियावरून आई डेम मॅगी स्मिथ यांच्या निधनाची माहिती दिली. पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘डेम मॅगी स्मिथ यांचे निधन झाल्याचे जाहीर करताना आम्हाला खूप दुःख होत आहे. 27 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या शेवटच्या क्षणी मित्र आणि कुटुंबिय उपस्थित होते.’

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT