पुढारी ऑनलाईन :
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक या १९८०-९० च्या दशकातील स्टार होत्या. त्यांचा आवाज आजही आपल्याला मोहित करून जातो. त्यांनी खूप कमी वयात आपल्या गायन करियरला सुरूवात केली होती. अनील कपूर आणि माधुरी दिक्षीत यांच्या 'तेजाब' चे गाणे 'एक दो तीन' ने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यांच्या गाण्याचा त्यावेळीही आणि सध्याही मोठा चाहता वर्ग आहे. यामध्ये एक नाव ओसामा बिन लादेनचे देखील आहे. (Osama bin Laden)
अहवालानुसार ओसामा बिन लादेन हा पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांच्या गाण्याचा मोठा चाहता होता. जेंव्हा २०११ मध्ये CIA ने ओसामाच्या ठिकाणांवर छापा मारला, तेंव्हा त्याच्या कॉम्प्युटरमधून बॉलिवूडची अनेक हिट गाणी मिळाली. यामध्ये उदित नारायण, कुमार साणू आणि अलका याज्ञिक यांच्या गाण्यांचा समावेश आहे.
ही गोष्ट जेंव्हा अलका याज्ञिक यांना सांगण्यात आली कि ओसामा बिन लादेनच्या कलेक्शनमध्ये तुमची गाणी होती. तेंव्हा त्यांना आश्चर्य वाटले. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, ओसामा बिन लादेन जो कोणी आहे, त्याला गाणी आवडली तर चांगले आहे ना.....
ओसामा बिन लादेनच्या कलेक्शनमध्ये 'अजनबी मुझको इतना बता', 'दिल तेरा आशिक' चा टायटल ट्रॅक आणि १९९४ चा चित्रपट 'जाने तमन्ना' ते उदित नारायण च्या 'तू चाँद हे पूनम का' सारख्या गाण्यांचा समावेश होता. याज्ञिक यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्यासोबत अनेक गायकांनी घाणेरडे राजकारण केले होते. त्या ज्या गाण्याची रिहर्सल करायच्या नंतर समजायचे ती गाणी दुसऱ्याच दिग्गज गायकाने गायली आहेत.