Ohh My Dog release date postpone due to Spider-Man: Brand New Day release  pudhari photo
मनोरंजन

Spider-Man: Brand New Day च्या मोठ्या रिलीजचा परिणाम; पंकज त्रिपाठींचा 'Ohh My Dog' ची रिलीज डेट टळली, नवीन डेट जाहीर

Spider-Man: Brand New Day च्या मोठ्या रिलीजचा परिणाम; पंकज त्रिपाठींचा 'Ohh My Dog' ची रिलीज डेट टळली, नवीन डेट जाहीर

पुढारी वृत्तसेवा

हॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित 'Spider-Man: Brand New Day' चित्रपटाच्या मोठ्या रिलीजमुळे पंकज त्रिपाठी यांच्या 'Ohh My Dog' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवरील मोठी टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेत असून आता चित्रपट नव्या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ohh My Dog latest update Bollywood box office news

पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका असलेला आगामी कौटुंबिक चित्रपट 'ओह माय डॉग'ची रिलीज डेट ख बदलण्यात आली आहे. सुरुवातीला ३१ जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन होते. मात्र, आता हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक अमित राय यांच्या या चित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) हिरवा कंदील मिळाल्यानंतरही रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामागील मुख्य कारण म्हणजे मार्वल स्टुडिओच्या बहुचर्चित 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' चित्रपट. हा चित्रपट ३१ जुलै रोजी रिलीज होतोय. तर दुसरीकडे, पंकज त्रिपाठी यांचा ओह माय डॉग देखील ३१ जुलैलाच रिलीज होणार होता. टॉम हॉलंड आणि झेंडाया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला देशभरातील अनेक स्क्रिन्स मिळू शकतात, ज्यामुळे मध्यम आणि लहान बजेटच्या चित्रपटांसाठी स्क्रिन्स उपलब्ध होणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे 'ओह माय डॉग'च्या निर्मात्यांनी प्रदर्शन एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

मार्वल स्टुडिओच्या अत्यंत बहुप्रतिक्षित 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'शी होणारी थेट बॉक्स ऑफिस स्पर्धा टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता ओह माय डॉग चित्रपट ७ ऑगस्ट रोजी रिलीज होईल.

दरम्यान, चित्रपटाला CBFC बोर्डाने चित्रपटाला 'U/A' प्रमाणपत्र दिले असून, त्याआधी काही आवश्यक बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांनुसार काही दृश्यांमध्ये सुधारणा करून चित्रपटाला अंतिम मंजुरी देण्यात आली.

ओह माय डॉगमद्ये काय करण्यात आले बदल?

सीबीएफसीच्या निर्देशानुसार चित्रपटातील 'ट्रू कॉलर' आणि 'डेटॉल' या ब्रँड्सचे उल्लेख हटवण्यात आले आहेत. तसेच एका संवादातील एका आक्षेपार्ह शब्दाचा आवाज म्यूट करण्यात आला आहे. एका कुत्र्याशी संबंधित सीनची लांबी दोन सेकंदांनी कमी करण्यात आली असून, एका फ्रेममध्ये दिसणारे भगवान हनुमान यांचा फोटो ब्लर (अस्पष्ट) करण्यात आला आहे. याशिवाय, बालमजुरी आणि मानवी तस्करी या विषयांशी संबंधित दोन स्वतंत्र डिस्क्लेमर चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्याचे निर्देशही बोर्डाने दिले आहेत.

हे आहेत महत्वाचे कलाकार?

अमित राय यांच्या दिग्दर्शनातील या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांच्यासोबत पवन मल्होत्रा, माही राय, राजेश कुमार आणि गीता अग्रवाल शर्मा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात ऑस्कर आणि ब्रुनो या प्रशिक्षित श्वानांसह तब्बल २५० हून अधिक कुत्र्यांचा सहभाग आहे. एका लहान मुलाचा आणि त्याच्या पाळीव श्वानाचा भावनिक प्रवास, त्यातून उलगडणारे नातेसंबंध, विनोदी प्रसंग आणि सामाजिक आशय यांचा सुरेख मेळ या कथेत पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT