O Romeo BO Collection day first  pudhari photo
मनोरंजन

O Romeo BO Collection : कमालीची स्टोरी..तृप्ती डिमरी-शाहिद कपूरच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद, ओपनिंग डेचा गल्ला किती?

O Romeo BO Collection- शाहिदच्या ‘ओ रोमियो’ने पहिल्या दिवशी तोडले आपल्याच चित्रपटांचे रेकॉर्ड

स्वालिया न. शिकलगार

‘ओ रोमियो’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत दमदार सुरुवात केली आहे. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असून त्यांच्या केमिस्ट्रीमुळे चित्रपटाला अधिक लोकप्रियता मिळाली आहे. वीकेंडमध्ये कलेक्शन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

O Romeo Box office Collection Day 1

बॉलीवूडमधील बहुप्रतीक्षित चित्रपट O Romeo अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत चर्चेत आला आहे. रोमँटिक-अॅक्शन थ्रिलर चित्रपटात Shahid Kapoor आणि Triptii Dimri यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि प्रभावी अभिनय प्रेक्षकांना भावला आहे. म्हणूनच चित्रपट समीक्षकांसोबतच सोशल मीडियावर देखील सिने रसिकांनी चित्रपटाच्या कथेला दाद दिलीय.

विशाल भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटाविषयी मागील काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. कायदेशीर अडचणीनंतर ओ रोमियो चित्रपटगृहात रिलीज झाला. आता रिलीजच्या पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.

ओ रोमियोच्या पहिल्या दिवशीची कमाई

रिपोर्टनुसार, 'ओ रोमियो' ने अपने ओपनिंग डे म्हणजेच १३ फेब्रुवारीला शुक्रवारी शानदार प्रदर्शन केलं. पहिल्याच दिवशी ८.२५ कोटींचे ओपनिंग केलं. ह्या आकड्यांनी शाहिदचे मागील चित्रपट 'देवा' आणि 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'ला मागे टाकले आहे. ओपनिंग डेचा विचार केला तर देवाने पहिल्या दिवशी ५.५० कोटी, 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' ने ६.७० कोटी आणि 'जर्सी'ने ३.२ कोटी रुपयांची सुरुवात केली होती. शाहिदच्या 'ओ रोमियो'ने त्याच्याच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

शाहिद - विशाल भारद्वाज यांचे शानदार चित्रपट

शाहिद कपूर-दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी याआधी 'हैदर', 'कमीने', 'रंगून' यासारखे खूप सुंदर चित्रपट एकत्र केले आहे. हा त्यांचा चौथा चित्रपट आहे. तृप्ती डिमरी पहिल्यांदा शाहिद सोबत काम केले आहे. चित्रपटात विक्रांत मैसी, अविनाश तिवारी, नाना पाटेकर यासारखे कलाकार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT