पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेमाजगतातील प्रसिद्ध अभिनेत्री गेना रोलँड्स (Gena Rowlands) चे अचानक निधन झाले. फॅन्स आणि इंडस्ट्रीतील तमाम कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Gena Rowlands)
‘नोटबुक’ स्टार गेना रोलँड्सचे ९४ वर्षी निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, गेना रोलँड्स दीर्घकाळ डिमेंशियाने पीडित होती. गेना रोलँड्स इंडियन वेल्स, कॅलिफोर्नियामध्ये राहायच्या. बुधवार, १४ ऑगस्ट रोजी तिचे पती रॉबर्ट फॉरेस्ट आणि मुलगी ॲलेक्जेंड्रासह परिवार आणि मित्र परिवार असताना त्यांचा मृत्यू झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री गेनाच्या मृत्यूचे वृत्त समोर आले होते. नंतर त्यांचा मुलगा निक कॅसावेट्सच्या एजेंटने या वृत्ताची पुष्टी केली. त्यांनी गेना यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा खुलसा आधी केला नव्हता. निक कॅसावेट्सने नंतर सांगितले की, त्याच्या आईला जून २०२४ मध्ये अल्झायमर झाला होता.
गेना यांचा जन्म जून १९३० मध्ये कंब्रिया, विस्कॉन्सिनमध्ये झाला होता. अभिनय करिअरची सुरुवात १९५० च्या दशकात केली. द सेवन ईयर इचमध्ये ब्रॉडवेची सुरुवात केली होती. नंतर टेलीव्हिजनकडे त्या वळल्या. १९५८ मध्ये पहिला चित्रपट द हाय कॉस्ट ऑफ लव्हिंगमध्ये अभिनय केला होता.