पुढारी ऑनलाईन डेस्क - दोन वर्षांपूर्वी नोरा फतेहीने अजय देवगन आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'थँक गॉड' या चित्रपटातील 'माणिक' या आयकॉनिक ट्रॅकने तिच्या चाहत्यांना वेड लावलं आहे. हे गाणे योहानने गायलेल्या 'माणिक मागे हिते' या व्हायरल श्रीलंकन ट्रॅकचे हिंदी रूपांतर होते आणि त्यात सिद्धार्थ मल्होत्रासोबत नोराची पहिली ऑन-स्क्रीन भूमिका होती. तिच्या आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय गाण्यापैकी हे गाणं आहे. नोराने सोशल मीडियावर काही BTS व्हिज्युअल शेअर केले आहेत.
तिने पोस्ट टाकल्यापासून तिच्या चाहत्यांनी कमेंट विभागात कौतुकाचा वर्षाव सुरू केला. "हे दृश्य चित्रपटात का नव्हते," एका चाहत्याने प्रश्न केला, तर नोराच्या दुसऱ्या चाहत्याने लिहिले, "'माणिक' नक्कीच आयकॉनिक आहे!". एकाने नोराला विचारले की, ती तिच्या ट्रॅकची स्वतःची आवृत्ती कधी रिलीज करणार आहे. 'माणिक' रिलीज झाल्यावर झटपट हिट ठरला, ज्यामुळे नोरा फतेहीची इंडस्ट्रीतील आघाडीची कलाकार म्हणून प्रतिमा उंचावली.
गेल्या काही वर्षांत नोराने इंडस्ट्रीत स्वत:साठी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या कामात फिफा विश्वचषक अँथम 'लाईट द स्काय', 'नोरा', 'पेपेटा' आणि बरेच काही यासारख्या चार्ट-टॉपिंग हिटचा समावेश आहे. तिने 'दिलबर' आणि 'ओ साकी साकी' यासह अनेक लोकप्रिय म्युझिक व्हिडिओंमध्ये देखील काम केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, तिला 'मडगाव एक्सप्रेस' मधील तिच्या अभिनयासाठी प्रशंसा मिळाली, ज्यामध्ये ती मुख्य भूमिकेत होती. आता, ती तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी तयारी करत आहे, ज्याची ती लवकरच घोषणा करणार आहे.