हिंदी कलाविश्वात सध्या अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे; पण यावर दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप काहीच भाष्य केलेले नाही. अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा रंगलेली असताना अभिषेकचे नाव अभिनेत्री निम्रत कौरसोबत जोडले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. यामुळे निम्रत हिला सोशल मीडियावर खूपच ट्रोल केले जात आहे. याचदरम्यान निम्नतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. यामध्ये निम्रत आणि अभिषेक 'दसवी' या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये सूत्रसंचालकाने अभिषेकने ऐश्वर्यासोबत लग्न केल्यामुळे अभिनंदन केले आणि लग्नाला १५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे दोघांचे कौतुक केले. यावर निम्रत म्हणाली, लग्न फार काळ टिकत नाही. तिचे वक्तव्य ऐकून शोचा होस्ट आणि अभिषेक दोघे चांगलचे हैराण झाले. व्हायरल व्हिडीओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. अभिषेक आणि निम्रत हिने 'दसवी' या सिनेमात एकत्र अभिनय केला आहे. या सिनेमात निम्नतने अभिषेकच्या पत्नीची भूमिका साकारली होती; पण आता दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत असल्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे. यावर दोघांनीही मौन बाळगत काहीच भाष्य केलेले नाही. कोणत्याही कार्यक्रमात किंवा सोहळ्यात ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत दिसत असते. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये वाद असल्याचे बोलले जात आहे.