प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची लेक मालती मारी हिने चौथा वाढदिवस मरमेड थीममध्ये साजरा केला. रंगीबेरंगी सजावट, खास केक आणि आनंदी वातावरणात हा बर्थडे साजरा करण्यात आला. प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून मालतीचा हा वाढदिवस सर्वांसाठी खास ठरला.
Priyanka Chopra Malti Birthday mermaid theme celebration
बॉलिवूड ते हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. नुकताच प्रियांका आणि निक जोनस यांनी आपल्या लेकीचा, मालती मारीचा चौथा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या खास दिवशी त्यांनी मरमेड थीम निवडली होती.
निक जोनास आणि प्रियांका चोप्राची मुलगी मालती चार वर्षांची झाली. आता तिच्या वाढदिवसाचे फोटो व्हायरल झाले आहेत. प्रियांका चोप्राने आपल्या मुलीच्या वाढदिसानिमित्त एक शानदार पार्टी ठेवली होती. या पार्टीची थीम मरमेड होती. या पार्टीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मरमेड थीमवर आधारित सजावट ही या पार्टीची मुख्य आकर्षण ठरली. खास थीम केक, मालती मेरीही या थीमला साजेशा पोशाखात गोंडस दिसली. प्रियांका चोप्राने या सेलिब्रेशनचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या वाढदिवसासाठी तिने एक भव्य पार्टी आयोजित केली होती. या पार्टीची थीम होती जलपरी. आता मरमेड थीमचे फोटो व्हायरल झाले असून निक जोनास ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, मालती जलपरी ड्रेसमध्ये दिसत आहे, जी खूपच सुंदर दिसतेय. त्यावेळी प्रियांका आणि तिच्या आईने देखील मालतीसाठी खास कॅप्शन शेअर केली.
मालतीचा वाढदिवस साजरा
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास दोघांनीही त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या कपलच्या मालतीवर फॅन्सनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. मालतीचा वाढदिवसाचा केकही लक्षवेधी ठरला. त्यामध्ये खास बाब म्हणजे, प्रसिद्ध डिस्ने पात्र एरियल आणि तिचा मित्र सेबॅस्टियनचा फोटो त्यावर आहे.
प्रियांकाने फोटो कॅप्शनमध्ये म्हटले की, "मला विश्वास बसत नाहीये की ती आता चार वर्षांची आहे."
तसेच प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनीही मालतीसाठी एक मेसेज दिला. त्यांनी लिहिलं-"मालतीने माझे आयुष्य आनंदाने भरले आहे. तुला खूप प्रेम, आशीर्वाद आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे."
प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट
ती राजामौली आणि महेश बाबू यांचा चित्रपट वाराणसीमधून पुन्हा बॉलिवूडमध्ये वापसी करत आहे.