पुढारी ऑनलाईन डेस्क - 'बिग बॉस' १८ रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. या सीझनचे कंटेस्टेंट्स कोण असतील? एकानंतर एक नावे समोर येत आहेत. त्याचा खुलासा हळूहळू होत आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, टीव्ही अभिनेत्री निया शर्मा या सीझनची पहिली कंटेस्टेंट कन्फर्म झाली आहे.
एका वेबसाईनुसार, सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे प्रत्येक वर्षी नियाने ऑफर नाकारली आहे. पण आथा ती या शोसाठी तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. तिने काही दिवसांपूर्वीच हा शो साईन केला आहे...'
बिग बॉसच्या आधी निया शर्मा रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी ८' चा हिस्सा होती. जिथे ती फायनलिस्ट होती. त्यानंतर तिने खतरों के खिलाडी - मेड इन इंडियामध्ये भाग घेतला आणि विजेती बनली.
टीव्ही कलाकार जान खान, अंजली आनंद, चाहत पांडे, स्प्लिट्सविला फेम कशिश कपूर, दिग्विजय राठी आणि 'स्त्री २' फेम 'सरकटा' सुनील कुमार यांची शोमध्ये एन्ट्री होऊ शकते.