New Marathi Film Sakhe Ga Saajani poster released  instagram
मनोरंजन

New Marathi Film |सोलो ट्रिपचा सुंदर प्रवास आणताहेत प्रार्थना, पूजा, अभिजीत; 'सखे गं साजणी'ची घोषणा

New Marathi Film Sakhe Ga Saajani | प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत, अभिजीत खांडकेकर घेऊन येताहेत 'सखे गं साजणी'

स्वालिया न. शिकलगार

मित्रांसोबत केलेला प्रवास आयुष्याला नवा अर्थ देणारा असतो आणि हाच अनुभव मांडणारा नवा मराठी चित्रपट ‘सखे गं साजणी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रार्थना, पूजा आणि अभिजीत या तीन कलाकारांचा सोलो ट्रिपमधील सुंदर प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात येणार असून नुकतीच चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

New Marathi Film Sakhe Ga Saajani

मित्रांसोबतचा प्रवास केवळ ठिकाणं बदलण्यापुरता मर्यादित नसून तो नाती अधिक घट्ट करणारा आणि आयुष्य नव्याने अनुभवायला शिकवणारा असतो. हाच भावनिक अनुभव मोठ्या पडद्यावर मांडणारा ‘सखे गं साजणी’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तीन मित्रांच्या प्रवासावर आधारित या चित्रपटाचं नुकतंच प्रदर्शित झालेलं पोस्टर प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवत आहे.

प्रार्थनाने एक मोश्न पोस्टर शेअर केला आहे. त्यात कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'एक सोलो ट्रिप… जी सगळ्यांना सोबत घेऊन जाते. हा सुंदर प्रवास अनुभवा!!' 'सखे गं साजणी' ३ एप्रिलपासून चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

'सखे गं साजणी' या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील तीन लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर. त्यांच्या भूमिकादेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

शेअर करण्यात आलेल्या पोस्टरवरील तिघांचा कुल अंदाज दिसत आहे. चित्रपटाची कथा प्रवासावर आधारित असली तरी स्वछंदी जगण्याचा आनंद लुटण्याचा अनुभव घेता येणार आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते, दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या ‘रेडबल्ब स्टुडिओ’ हाऊसचा हा चित्रपट आहे. दिग्दर्शन अभिषेक जावकर यांनी केले आहे. निर्मिती अभिषेक जावकर, आदित्य वासुदेव घरत, अभिजीत खांडकेकर, श्रेयश सावंत यांची आहे. सहनिर्माते अभिषेक दिलीप वाकचौरे आणि जातीं उपाध्याय आहेत. पोस्टर पाहून हा चित्रपट मैत्रीची नव्याने ओळख करून देणार असल्याचं दिसतंय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT