मनोरंजन

आलिया-शाहरुखच्या ‘डार्लिंग्ज’साठी नेटफ्लिक्सने मोजले ८० कोटी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सध्या थिएटर्समध्ये रीलिजसाठी सज्ज झालेला असतानाच तिच्या आगामी 'डार्लिंग्ज'बाबत एक अपडेट समोर आली आहे. हा चित्रपट थेट ओटीटीवर रीलिज करण्यात येणार आहे आणि त्यासाठी नेटफ्लिक्सने 80 कोटी रुपये मोजले आहेत.

या चित्रपटात आलियासोबत शेफाली शाह आणि शाहरुख खान यांच्याही भूमिका आहेत. शाहरुखच्या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शाहरुख आणि आलियाने यापूर्वी गौरी शिंदे दिग्दर्शित 'लव्ह यू जिंदगी' चित्रपटात एकत्र काम केले होते. दरम्यान, 'डार्लिंग्ज' हा माय-लेकीच्या नातेसंबंधांवर आधारित ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. जसमीत के रीन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून विशाल भारद्वाज यांनी संगीत दिले आहे.

सध्या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. एप्रिल ते मे या काळात हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येऊ शकतो. आलियाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर तिचे 'आरआरआर', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'बैजू बावरा' तसेच ज्युनिअर एनटीआरसोबतच्या एका पॅन इंडिया चित्रपटात ती दिसणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT