मोठ्या पडद्यासह छोट्या पडद्यावरीलही अनेक कलाकारही सातत्याने चर्चेत असतात. त्यातीलच एक म्हणजे गायिका नेहा भसीन होय. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्याही फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहा ही नेहमीच सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बिग बॉस ओटीटी'च्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली गायिका नेहा हो खूपच चर्चेत आली आहे. नेहाने तिच्या एका इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली असल्याने तिची चर्चा रंगली आहे. नेहा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून रॅपर्सवर निशाणा साधला आहे. नेहा पोस्टमध्ये म्हणाली की, मी त्या सरासरी पुरुष रॅपर्सना कंटाळली आहे, जे त्यांच्या गाण्यांमध्ये नेहमी महिलांबाबत विचित्र गोष्टी बोलत असतात आणि भारतीय पुरुष आणि महिलांनाही यावर तक्रार नसते. (Neha Bhasin)
भारतात याला काही मर्यादा आहे की नाही? मुलाने केले तर भाऊ गूड आणि मुलीने केले तर कॅरेक्टर ढीला... असे बोलले जाते. माझ्याकडे कोणताही पिंजरा नाही, जो मला खोलायचा आहे. मी कोणती दद्ध मलाई नाही. आता जरा मोठे व्हा. पण, नेहाची ही पोस्ट काही लोकांना आवडली, तर अनेकांनी नेहाला ट्रोलही केले आहे. तुम्हारा कैरेक्टर ढीला ही है, अशी प्रतिक्रिया एकाने तर जे लोक आयुष्याला कंटाळलेले असतात त्यांना असेच वाटते, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एकाने दिली आहे. नेहाने कलाविश्वातील अनेक दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. अस्सलाम-ए-इश्कुम गाना, मेरे ब्रदर की दुल्हन, स्वैग से स्वागत यांसारख्या गाण्यांना तिने आवाज दिला आहे.(Neha Bhasin)