नीता अंबानी यांनी पुजेत खास ब्लाऊज परिधान केले  Nita Ambani Instagram
मनोरंजन

Anant Ambani Radhika Merchant चे लग्न आज; खास पूजा अन्...

अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या पुजेत नीता अंबानींनी घातले 'हे' खास ब्लाऊज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचे लग्न आज १२ जुलै रोजी मुंबईत आहे. देश-परदेशातील दिग्गज या शाही लग्नात उपस्थित असतील. त्यासाठी खूप खास नियोजन करण्यात आले आहे.

लग्नासाठी खास पूजा

सात फेरे घेण्याआधी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटसाठी गुरुवारी एंटीलियामध्ये खास शिव पूजा ठेवण्यात आली होती. यामध्ये बॉलीवूडच्या तमाम बडे स्टार्स सहभागी झाले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाची चर्चा संपूर्ण जगभरात होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे लग्न जगभरातील महाग लग्नांपैकी एक असेल.

अनंत-राधिकाच्या शाही लग्नात खूप खास नियोजन

अनंत अंबानी - राधिका मर्चेंट आज विवाह बंधनात अडकणार आहेत. देश-परदेशातील पाहुणे या लग्नात सहभागी होतील. अनंत आणि राधिकाचा साखरपुडा मागील वर्षी झाला होता. त्यानंतर यावर्षी दोन प्री-वेडिंग फंक्शन झाले.

पुजेत नीता अंबानी सुनेपेक्षा दिसल्या सुंदर

पुजेदरम्यान, नीता अंबानी यांनी ब्ल्यू-ग्रीन कलर कॉम्बिनेशन लेहेंगा परिधान केला होता. नीता अंबानी इतक्या सुंदर दिसत होत्या की, त्यांच्यासमोर होणारी सून राधिका मर्चेंटही मागे पडली.

नीता अंबानींच्या या लेहेंग्यात खास आहे तरी काय?

नीता अंबानी यांच्या लहेंग्याच्या बॉर्डरवर जिगजॅग लाईनमध्ये एम्ब्रॉयडरी केली होती. पण, त्यांनी परिधान केलेले ब्लाऊज खास ठरले. नीता यांनी सोन्याचे ब्लाऊज परिधान केले होते. चंदन हार आणि चांदीच्या धाग्यांनी बनवलेले हे ब्लाऊज होते. अबू जानी संदीप खोसलाचा हेवी एम्ब्रॉयडरी लहंगा चोली परिधान करून नीता अंबानी पुजेत पोहोचल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT