Movie Nayyi Navelli teaser out 
मनोरंजन

Movie Nayyi Navelli teaser |‘नयी नवेली’चा भन्नाट टीझर रिलीज; यामी गौतमचा अनोखा अवतार पाहून नेटकरी म्हणाले..'सुपरहिट'

‘नयी नवेली’चा भन्नाट टीझर रिलीज; यामी गौतमचा अनोखा अवतार पाहून नेटकरी म्हणाले..'सुपरहिट'

पुढारी वृत्तसेवा

Movie Nayyi Navelli teaser released

बहुप्रतीक्षित ‘नयी नवेली’ या थिएट्रीकल चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कौटुंबिक नात्यांमधील गंमती-जमती, विनोद, फँटसी आणि दमदार ॲक्शन या चित्रपटात पाहता येणार आहे. ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि कलर यलो यांच्या या चित्रपटात यामी गौतम धर प्रमुख भूमिकेत आहे. दिग्दर्शन बालाजी मोहन तर हिमांशू शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. तर प्रसिद्ध संगीतकार जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

टीझरची सुरुवात एका अगदी सामान्य आणि साध्यासुध्या कुटुंबाच्या वातावरणातून होते. मात्र, कुटुंबातील दीर अचानक आपल्या भावजयीवर गंभीर आणि धक्कादायक आरोप करत, "भाभी डायन आहे!" असे म्हणतो. या एका वाक्यानंतर कुटुंबाच्या आयुष्यात सुरू होतो विचित्र घटनांचा सिलसिला. त्यानंतर समोर येणारी अनोखी पात्रे, गूढ प्रसंग आणि अनपेक्षित घडामोडींसाठी चित्रपट पाहावा लागणार आहे.

या सगळ्या गोंधळाच्या मध्यभागी यामी गौतम धर एका पूर्णपणे वेगळ्या आणि यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसत आहे. तिची व्यक्तिरेखा काय असेल हे फारसे टीझरमध्ये दि,त नाही. पण तरीही तिच्या लूकमुळे हा हॉरर मिस्ट्री थ्रीलर असल्याचे लक्षात येते. ‘नयी नवेली’ची कथा अशा जगात घडते, जिथे दिसतंय तेच खरं आहे असं मानणं कठीण आहे. एका धक्कादायक आरोपामुळे सुरू झालेल्या घटनांची मालिका पुढे कोणते वळण घेते, हे पाहणे रंजक ठरणार आहे. आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून बालाजी मोहन यांनी दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटात यामी गौतम धरसोबत आदिनाथ एम. कोठारे, अनुराग ठाकूर, सुनिता रजवार, मीता वशिष्ठ, आदित्य कुलश्रेष्ठ, सुस्मिता मुखर्जी, सोनल झा, सुनील सिन्हा, प्रतीक पचोरी, अक्षत सिंग, बबिता पांडे, अजय पाल आणि नीरज सिंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘नयी नवेली’ मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामी गौतमचा हा हटके अवतार आणि चित्रपटाची अनोखी कथा काय कुतुहल घेऊन येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले युजर्स?

टीजर रिलीज झाल्यानंतर युजर्स म्हणाले- हे तर सुपरहिट आहे, यामी गौतमने खूप छान काम केले आहे. दुसऱ्या युझरने लिहिले, दिग्दर्शक बालाजी मोहन यांना पहिल्यांदाच एक मोठी निर्मिती मिळाली आहे. हे आशादायक आहे. आणखी एका युझरने म्हटले, यामी बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहणे छान वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT