नवरात्री स्पेशल भक्तिमय चित्रपट Instagram
मनोरंजन

नवरात्री स्पेशल भक्तिमय चित्रपट पाहा OTT वर!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर देवी शक्तीचा महिमा दर्शवणारे खास भक्तिमय चित्रपट प्रेक्षकांसाठी सादर करण्यात येत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत गाजेलेल्या 'मा शाकंभरीचा महिमा', 'कुलस्वामिनी', 'जोगवा आंबाबाईचा', 'माय माऊली मनुदेवी', 'काळुबाई पावली नवसाला', 'कानबाई माझी नवसाची', 'आस्थारूप जय वैभवलक्ष्मी' इत्यादी भक्तिमय चित्रपटांच्या निमित्ताने तुम्हाला देवी महिमेचा अनुभव घेता येईल.

मुख्य म्हणजे सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आणि एकापेक्षा एक दर्जेदार कलाकार रमेश भाटकर, तेजा देवकर, अशोक शिंदे, विलास उजवणे यांच्याही या चित्रपटांत मुख्य भूमिका आहेत. या सर्व चित्रपटांत स्त्री आणि देवी शक्तीची परीक्षा दाखवण्यात आली आहे. हे चित्रपट नक्कीच तुमच्यापर्यंत एक मोलाचा संदेश पोहोचवण्याचे देखील काम करतील.

नवरात्रीच्या या उत्सवात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना भक्ती, विश्वास, आणि आध्यात्मिक अनुभव जाणून घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. नवरात्रीमध्ये आपण मनोभावे देवीची पुजा करतो आणि सर्व चिंता, संकटे विसरून देवीच्या भक्तीत रमतो. या काळात देवीची आराधना केली जाते आणि सुख, समृद्धी, आणि आरोग्यासाठी तिचे आशीर्वाद मिळवण्याची प्रार्थना केली जाते.

अशा या वातावरणात भक्तिमय चित्रपट बघून हा अध्यात्मिक अनुभव कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी सहजपणे घेतला जाऊ शकतो हेच या चित्रपटांच्या सादरीकरणाचे मूळ उद्दिष्ट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT