मनोरंजन

हार्दिक पांड्या-नताशाचे भांडण संपुष्टात? सोशल मीडियावर कपल फोटो पुन्हा दिसले

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची त्नी, अभिनेत्री नताशामध्ये बिनसल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाची चर्चाही रंगली. तसेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिने हार्दिक पांड्यासोबतचे फोटो हटवल्याचेही दिसले. आता सोशल मीडियावर पुन्हा या कपलचे फोटो पाहायला मिळत आहेत.

अधिक वाचा –

सोशल मीडियावर नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाचे वृत्त पसरले. पण, दोघांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नाही. पण, त्यांच्या मौनाने दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचा अंदाज लावला जात होता. दरम्यान, नताशा सातत्याने इन्स्टाग्रामवर अनेक अपडेट्स शेअर करते. आता नताशाने आपल्या इन्स्टाग्रामवर हार्दिक पांड्या सोबतचे लग्न आणि व्हॅलेंटाईनसहित अनेक फोटोज रि-स्टोर केले आहेत.

अधिक वाचा –

नताशाने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर हार्दिकसोबतचे सर्व फोटो रि-स्टोर केल्याचे दिसते. यामध्ये व्हॅलेंटाईन डे आणि तिच्या लग्नातील सुंदर फोटोंचा समावेश आहे. फोटोज अचानक गायब होणं आणि पुन्हा रि-स्टोर करण्यामागील खरे कारण अद्याप समजलेले नाही.

अधिक वाचा –

SCROLL FOR NEXT