अभिनेता सनी देओलच्या 'गदर-2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरक्षः धुमाकूळ घातला. 500 कोटी रुपयांहून अधिक कमाई या सिनेमाने केली. आता या सिनेमाच दिग्दर्शक अनिल शर्मा सध्या हे त्यांच्या आगामी 'जर्नी' चित्रपटाची घोषणा केली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून त्यांच्या आगामी 'जर्नी' या सिनेमाची घोषणा केली. ते म्हणतात की, 'गदर-2' या सिनेमाच्या यशानंतर बाबा काशी विश्वनाथ यांच्या आशीर्वादाने आगामी 'जर्नी'ची सुरुवात केली आहे. हे ट्वीट करताना शर्मा यांनी काही फोटो शेअर केले आहेत. यात अभिनेते नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा दिसत आहेत.या सिनेमात नाना मुख्य भूमिकेत आहेत. अन्य कलाकारांबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. 22 वर्षांनी अनिल शर्मा यांनी 'गदर-2' या सिनेमाच्या माध्यमातून जबरदस्त सुपरहीट चित्रपट दिला. आता त्यांच्या या आगामी 'जर्नी'ची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.