naal 2 
मनोरंजन

Naal 2 : नागराज मंजुळेंच्या नाळ चित्रपटाचा दुसरा भाग येणार, काय असणार नवीन कथा?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : फँड्री, सैराटसारखे हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन येताहेत. नागराजच्या नाळ या हिट चित्रपटाचा दुसरा भाग येतोय. याबाबतची माहिती नागराज यांनी स्वत: इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिलीय.(Naal 2 ) मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकवायला कधी भेटुयात? अशी कॅप्शन लिहित, नागराज यांनी नाळ २ विषयी थोडक्यात माहिती दिलीय. (Naal 2 )

नागराज यांनी इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलंय, मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की, नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकवायला कधी भेटुयात ?

नाळचा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नी भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं.

पहिल्या "नाळ" प्रमाणेच 'नाळ'चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे !

"नाळ 2" नावानं चांगभलं !!!

या थोडक्यात माहितीनंतर या पोस्टला चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या भरभरून शुभेच्छा मिळू लागल्या आहेत. एका चाहत्याने म्हटलंय- ✌नागराज आण्णा च्या नावानं चांगभलं…❤️#आण्णा आम्हाला पण ध्या कीं एखाद्या कान्या-कोपऱ्यात TV मधे झळकन्याची संधी…आपलाच…MH28_बुलडाणाकर…?. दरणीय नागराज सर …. प्रथम जय भीम …. तुम्हाला खूप शुभेच्छा … आणि तुमाला भेटायची इच्छा आहे … ???, ?? khup excited ahe sir naal 2 sathi….?, Vaa.sir ????, Sir ek marathi song lihla ahe song cha nav ( Navas khandobacha ) As ahe, Best of luck Anna ? keep it up?, Tumi post karun sabgitl manje ky triii chagl pahayla milnar ?♥?, खूप खूप शुभेच्छा पुढील यशाच्या शिखरावर एक नवीन झेप…??, खूप खूप सदिच्छा अण्णा ☘️?, अभिनंदन!!! चित्रपट खूप मस्त होणार आहे याच काही शंकाच नाही ?? . कमेंट बॉक्समध्ये अशा भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी I love u nagaraj sirrrr❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ शेअर करत प्रेम व्यक्त केलंय.

या कमेंट वरूनच दिसते की, चाहते नाळ २ पाहण्यासाठी किती उत्सुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT