जिओ स्टुडिओजची मोठी घोषणा केली असून नागराज मंजुळे दिग्दर्शित 'खाशाबा'चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित भव्य क्रीडापट येत आहे. "खाशाबा" चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करत १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये तो रिलीज होणार असल्याची अधिकृत माहिती जिओ स्टुडिओजने दिली.
चित्रपटगृहांमध्ये पहिल्यांदात रिलीज झालेल्या खाशाबाच्या टिझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता तो डिजिटल प्लॅटफॉर्मसवर रिलीज करण्यात आला आहे. पारंपरिक कुस्तीच्या आखाड्यामध्ये भव्य चित्रण, दमदार दृश्ये, संघर्ष आणि चित्रपटाचा सिनेमॅटिक आवाका या टीझर मधून प्रभावीपणे अनुभवायला मिळतो.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावत भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करणाऱ्या खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे.
'खाशाबा' हा चित्रपट स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आणि भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा इतिहास घडवला.
चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे. खाशाबा यांच्या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली असून, त्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. या नवोदित कलाकारासोबत त्याबरोबरच जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम, आणि गार्गी कुलकर्णी यांसारख्या कलाकारांचा अभिनय असणार आहे.
जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'खाशाबा' या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी केले आहे. 'खाशाबा' १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.