दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यने अभिनेत्री ना समांथा काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री शोभिता धुलिपाशी साखरपुडा केला. आता नागाने तिच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे; पण नागा आणि शोभिताच्या फोटोंवर अनेकांनी टीका केली. त्यानंतर नागाने थेट त्याचा कमेंट सेक्शनच बंद केला. नवीन पोस्टमध्ये, नागा आणि शोभिता यांनी काळ्या रंगाचे ड्रेस घातल्याचे दिसत आहे. नागाने ग्रे टी-शर्टवर काळ्या रंगाचे लेदर जॅकेट घातले आहे, तर शोभिताने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप, जीन्स आणि कंबरेला जॅकेट घातले आहे. आरशात पाहून सेल्फी काढतानाचा दोघांचा हा फोटो नागाने पोस्ट केला होता आणि 'एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ट वन्स' असे नागाने फोटोला कॅप्शन दिले आहे. यानंतर फोटोवर लाईक्स आणि प्रतिक्रिया वर्षाव झाला आणि बहुतांश नेटकऱ्यांनी त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
सर्वात बेकार कपल अशी प्रतिक्रिया एकाने, तर धोकेबाज जोडपे अशी दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया दिली. यानंतर अवघ्या २० मिनिटांच्या आतच नागाने कमेंट सेक्शनच बंद करून टाकले. त्यामुळे कोणीही टीका करू शकणार नाही. यापूर्वी शोभिता सोबतच्या साखरपुड्याचे फोटो टाकल्यावरही त्या दोघांना टीकेचा आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता नागा आणि शोभितावर होत असलेल्या ट्रोलिंगची चर्चा सर्वत्र रुथ प्रभूसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रंगली आहे.