पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचा सुपरस्टार नागार्जूनचा मुलगा अभिनेता नागा -चैतन्य आणि शोभिता धुलिपाला आज (दि.४) विवाहबंधनात अडकले असून त्यांच्या विवाहसोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आहे. हैदराबादमधील प्रतिष्ठित अन्नपूर्णा स्टुडिओमधील भव्य मंडपात त्यांचा विवाहसोहळा होत आहे. या विवाहसोहळ्याला मेगास्टार चिरंजीवी आपला मुलगा रामचरणसोबत कार्यक्रमस्थळी पोहोचला आहे. (Naga Chaitanya-Sobhita Wedding)
नागा चैतन्य आणि शोभिता यांचा ऑगस्टमध्ये साखरपुडा झाला होता. त्यानंतर लवकरच आम्ही लग्नबंधनात अडकणार असल्याचे नागा-चैतन्य याने माध्यमांशी बोलताना सांगितले होते. आज त्यांचा विवाह झाला असून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.यादरम्यान विवाहस्थळाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. (Naga Chaitanya-Sobhita Wedding)