पुढारी ऑनलाईन डेस्क - वेड, झिम्मा, बाईपण भारी देवा, पावनखिंड यासारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर स्टार प्रवाहवर ‘नाच गं घुमा’ या नव्याकोऱ्या चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे. नोकरदार महिला आणि तिच्या दैनंदिन आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग असणारी मोलकरीण बाई यांच्या नात्याची गंमतीशीर गोष्ट ‘नाच गं घुमा’ चित्रपटातून मांडण्यात आली आहे. फक्त महिला वर्गच नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट आपलीशी वाटेल. मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट प्रत्येकानेच पाहायला हवा.
नाच गं घुमा अशीच एक धमाल पण रोजच्या जीवनातील संबंधित चित्रपट आहे जो आशय आणि करमणुकीची सुंदर सांगड घालून देतो. घरातल्या प्रत्येकासाठी हा चित्रपट रसिकांसाठी करमणुकीची मेजवानी असेल.
नाच गं घुमा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार २० ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.