नवी दिल्ली : सतीश कौशिक यांच्या मृत्यूला नवे वळण मिळाले आहे. कौशिक मृत्यूपूर्वी दिल्लीच्या कापसहेडा येथील एका फार्म हाऊसमध्ये गेले होते. हे फार्म हाऊस विकास मालू यांचे आहे. कौशिक यांनी माझ्या पतीला 15 कोटी रुपये दिले होते. ते द्यावे लागू नयेत म्हणून त्यांनी कौशिक यांच्या खुनाचा कट रचला होता, असा खळबळजनक आरोप फार्म हाऊस मालकाच्या पत्नीने (शानवी) पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतून केला आहे. कौशिक गतवर्षीही आमच्या दुबईतील फार्म हाऊसमध्ये पैशांच्या मागणीसाठी आले होते. तेव्हाही दोघांमध्ये वाद झाला होता, असे शानवी यांनी या तक्रारीत नमूद केले आहे.