प्रसाद खांडेकर 
मनोरंजन

Mumbai Pune Expressway‌ | ‘साला एक टँकर.....’ : मुंबई - पुणे एस्प्रेसवेवरील वाहतूक कोंडीवर हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरची मिश्किल प्रतिक्रीया

प्रवास करत असताना कारमधूनच टँकर दाखवत बोलला एकच वाक्य

Namdev Gharal

मुंबई : मुंबई–पुणे एक्स्प्रेस-वेवर मंगळवारी (3 फेब्रुवारी) सकाळी एक ज्वलनशिल पदार्थ असलेला टँकर उलटला आणि हा एक्स्प्रेस वे जवळपास 30 तास ठप्प झाला. या कोंडीमुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास जवळपास थांबला होता खोपोलीजवळील अदोशी बोगद्याजवळ हा टँकर उलटलल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती.

या टँकरमध्ये प्रॉपेलिन हे अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याचे लक्षात आल्याने यंत्रणा सतर्क झाली. एखादी छोटी ठिणगी पडली तरी अतिज्वलनशील वायूमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. 36 तासांनंतर मुंबई–पुणे एक्सप्रेस वे झाला मोकळा झाला होता पण या अपघातामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.

प्रसाद खांडेकरने एकाच वाक्यात केली मिश्किल टीपण्णी

आता या हायवेवरुन हास्यजत्राफेम प्रसाद खांडेकर प्रवास करत होता. यावेळी त्‍याची कार खोपोलीजवळील अदोशी बोगद्याजवळ आली त्‍यावेळी त्‍या टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरला जात होता. याचवेळी त्‍याने म्हटले की साला एक टँकर मुंबई पुणे ट्रॅफिक जॅम कर देता है, दिखा ओ टँकर’ असे म्हणत तो टँकर व वाहतूक कोंडी तसेच संथ गतीने चाललेलीर वाहतूक दाखवतो. अशा कोंडींच्या वेळी सर्व सामान्यांचे हाल काय होऊ शकतात हे प्रसाद खांडेकरने अगदी मजेशीर अंदाजात सांगितले आहे. या व्हिडीओतून बोलकी प्रतिक्रीया व्यक्त झाली आहे.

कोंडीचा फटका सर्वांनाच

अंत्‍यत रहदारीचा हा मुंबई - पुणे एस्प्रकस वे दोन्ही शहरांची लाईफ लाइन आहे यावरुन रोज प्रवास करणारे असतात. पण अशा आणिबाणीच्या स्थितीत मोठे हाल होतात. यात सामान्य प्रवासी ते सेलिब्रेटीही अडकतात. दोन दिवस तर अनेक प्रवशांना हायवेवर पाण्याविना तडफडावे लागल्याचे चित्र होते. तर या कोंडीमुळे जुन्या पूर्ण मुंबई महामार्गावरही वाहतूक कोंडी अगदी संथ होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT