देवाचं घर म्हणजे काय? उत्तर मिळणार ३१ जानेवारीला Instagram
मनोरंजन

Mukkam Post Devach Ghar | सहकुटुंब पाहता येणारा "मुक्काम पोस्ट देवाचं घर"

देवाचं घर म्हणजे काय? उत्तर मिळणार ३१ जानेवारीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - देवाचं घर म्हणजे काय? ते नक्की कुठे असत? या एका लहान मुलीला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटातून मिळणार आहे. या चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीजर नुकताच लाँच करण्यात आला. हा चित्रपट ३१ जानेवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवालाही पत्र पोहोचेल, अशा अनोख्या कल्पनेतून सुरू होणाऱ्या टीजरमुळे "मुक्काम पोस्ट देवाचं घर" मनाला भिडणारी गोष्ट नक्कीच सांगणार असल्याचा अंदाज देतो. एका लहान मुलीला पडलेल्या प्रश्नाचं काय उत्तर असेल याचा शोध या चित्रपटातून घेण्यात आला आहे. तसेच दरम्यान तिच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींची जोडही देण्यात आली आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीनं ही गोष्ट उलगडणार असून सहकुटूंब हा चित्रपट पाहता येणार आहे. त्यामुळे "मुक्काम पोस्ट देवाचं घर" हा चित्रपट येत्या ३१ जानेवारीपासून चित्रपटगृहात जाऊनच पाहायला हवा यात शंका नाही.

मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार - महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे. मायराचा अवखळ अंदाज सविता मालपेकर आणि उषा नाडकर्णी यांची खमंग फोडणी त्याला प्रथमेश परब, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, रेशम श्रीवर्धन कलाकार असणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT