Mrunal Thakur new look in dacoit  pudhari photo
मनोरंजन

Mrunal Thakur: 'सीतारामम'ची नाजूक 'सीता' आता बनली 'लेडी डाकू'? मृणालचा थक्क करणारा बदल; ट्रेलरमधील 'त्या' सीनची सर्वत्र चर्चा

'सीतारामम'ची नाजूक 'सीता' नव्हे तर 'डकैतची सरस्वती'! मृणाल ठाकूरचा थक्क करणारे ट्रान्सफर्मेशन; ट्रेलरमधील 'या' सीनची होतेय चर्चा

पुढारी वृत्तसेवा

मृणाल ठाकूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक ग्लॅमरस आणि साध्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, तिच्या आगामी 'डकैट' चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'सीता रामम' मधील नाजूक 'सीता महालक्ष्मी' आता 'डकैट'मध्ये 'सरस्वती' नावाच्या एका कणखर आणि रांगड्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये मृणालने ज्या प्रकारे हातात बंदूक पकडली आहे आणि तिचा जो आक्रमक अवतार दिसत आहे, त्याची तुलना थेट साऊथच्या 'श्रीवल्ली'शी केली जात आहे. मृणालचे हे 'अ‍ॅक्शन ट्रान्सफॉर्मेशन' सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे

मृणाल ठाकुर हिने सीता रामम मध्ये साकारलेली नाजूक आणि सोज्वळ ‘सीता महालक्ष्मी’ने प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घातली. आता मात्र तिचा पूर्णपणे वेगळा अवतार समोर आला आहे. नव्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मृणाल नव्या लूकमध्ये दिसतेय. तिचा हा दमदार आणि रौद्र लूक पाहून फॅन्सही थक्क झाले आहेत. डकैतचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यातील एका सीनची जोरदार चर्चा रंगलीय. मृणालच्या आगामी चित्रपट 'डकैट'चा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात मृणालने साकारलेली 'सरस्वती' ही भूमिका लक्षवेधी ठरलीय.

'सीता' ते 'सरस्वती' असा थक्क करणारा प्रवास

'सीता रामम' या चित्रपटामुळे मृणाल ठाकूरला घराघरात ओळख मिळाली. त्या चित्रपटातील संयमी आणि नाजूक 'सीता' प्रेक्षकांना आजही आठवते. नाजूक आणि मजबूत अशा दोन्ही गुणांचा सुंदर मिलाफ ती होती. मात्र, 'डकैट'च्या ट्रेलरमध्ये मृणाल अगदी विरुद्ध भूमिकेत आहे. डोळ्यातील संताप, हातात बंदूक आणि सुडाने पेटलेली भावना असा मृणालचा लूक पाहिल्यामुळे ती एका डाकूच्या भूमिकेत दिसेल, असे म्हटले जात आहे.

ट्रेलरमधील 'त्या' सीनची चर्चा

'डकैट'च्या ट्रेलरमध्ये एक असा सीन आहे जिथे मृणाल शत्रूवर तुटून पडते आणि तिच्या डोळ्यात एक प्रकारची आग दिसते. हा सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या मते, मृणालने ज्या तीव्रतेने ही भूमिका साकारली आहे, त्यावरून ती साऊथच्या 'पुष्पा' मधील रश्मिका मंदानाला (श्रीवल्ली) कडक टक्कर देणार आहे. साध्या साडीतही एखादी अभिनेत्री इतकी आक्रमकता दाखवू शकते.

मृणाल काय म्हणाली?

ट्रेलर लॉन्चवेळी मृणालने आपल्या भूमिकेबद्दल सांगितले की, डकैतमध्ये तिची सरस्वती ही भूमिका अगदी खास आहे. सरस्वतीची भूमिका साकारून तिने स्वत:ला आणखी मजबूत अनुभवलं, असं ती सांगते. ती म्हणाली की, जर या चित्रपटातून सरस्वती पात्र काढले तर चित्रपट चालणार नाही. म्हणूनचं तिने डकैतसाठी सरस्वती भूमिका स्वीकारल्याचे म्हटले. माझ्यासाठी भाषेहून अधिक चित्रपटाचे जॉनर अधिक महत्त्वाचे आहे. या चित्रपटात ॲक्शन सोबत इमोशन्स बॅलेन्स करणं खूप वेगळा अनुभव असल्याचे ती म्हणाली.

ती पुढे म्हणते की, प्रत्येक सीनमध्ये बॉडी लँग्वेज, पॉज आणि डायलॉग डिलीवरी खूप गरजेचे आहे. तिने पुढे सांगितले की, ॲक्शन भूमिकेसाठी तिला एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेज सारख्या गोष्टी शिकाव्या लागल्या.

काय आहे 'डकैट'ची कथा?

डकैत: एक प्रेम कथा चित्रपटाची कहाणी अगदी हटके आहे. असा एक व्यक्ती ज्याला चुकीच्या पद्धतीने एका गुन्ह्यात अडकवलं जातं. यानंचतर तो तुरुंगातून पळून जातो. आणि आपल्या एक्स प्रेयसीला फसवतो. चित्रपट प्रेम, दोका आणि सूडाच्या भावनेवर आधारित आहे. यात मृणाल ठाकूरने 'सरस्वती' ही व्यक्तिरेखा साकारलीय. ती बंदूक उचलणारी एक कणखर महिला दाखवण्यात आली आहे. यापूर्वी मृणालला अशा प्रकारच्या भूमिकेत याआधी कधीच पाहिले गेले नाहीये.

शनेल देव दिग्दर्शित डकैत: एक प्रेम कथाची निर्मिती सुप्रिया यारलागड्डाने कलीय. सहनिर्मिती सुनील नारंग, अन्नपूर्णा स्टूडियोजने प्रेजेंट किया है. शेष-शनेलची कहाणी आणि स्क्रीनप्ले असून संवाद अब्बूरी रवि यांचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT